🔥देवळी येथे माजी खासदार तडस यांनी केले इफ्तार पार्टीचे आयोजन.🔥पवित्र रमजान महिन्यामध्ये इफ्तार पार्टीच्या आयोजनाचे ४२ वे वर्ष.
देवळी -/शहरांमध्ये मुस्लिम बांधवांच्या पवित्र रमजान महिन्यांमध्ये माजी खासदार रामदास तडस यांच्याकडून इफ्तार पार्टीचे त्यांच्या निवासस्थानी दि.१४ मार्च शनिवार रोजी सायंकाळी सात वाजता आयोजन करण्यात आले होते. मुस्लिम बांधवांच्या या रमजान महिन्यांमध्ये माजी खासदार रामदास तडस कडून हे ४२ वर्षापासून कायम ठेवलेली त्यांची परंपरा आहेत.सर्वधर्म समभाव या भावनेतून या इफ्तार पार्टीचे आयोजन सायंकाळी सात वाजता त्यांच्या निवासस्थानी करण्यात आले.त्यामध्ये न.प चे उपाध्यक्ष राहुल चोपडा,नगरसेवक विलास जोशी,न.प गटनेता उमेश कांमडी,मस्जीदे मोहम्मदिया चे इमाम,व जामा मस्जिद चे इमाम,यांच्या सह अ.जब्बर तवर,मोहम्मद शफी,हबीब पठाण, अ. हमीद तवर,अयुब अली,पत्रकार समीर शेख,तसेच देवळी नगर परिषदेच्या नगरसेविका उपस्थित होत्या.
मंचावर उपस्थित पाहुण्यांचे माजी खासदार रामदास तडस यांच्याकडून शाल व हार अर्पण करून त्यांचे सत्कार करण्यात आले. त्यानंतर देवळीतील मुस्लिम बांधवांनी माजी खासदार रामदास तडस यांचे शाल व हार अर्पण करून त्यांचे सत्कार करण्यात आले.या कार्यक्रमांमध्ये माजी खासदार रामदास तडस यांनी आपल्या भाषणातून सामाजिक बंधुत्वावर जोर दिला मी जिवंत असे पर्यंत या इफ्तार पार्टीचे आयोजन होत राहील तसेच या देवळीमध्ये धार्मिक एकता कायम राहील तसेच सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत समाप्त केले. त्यानंतर देवळी न.प चे उपाध्यक्ष राहुल चोपडा व नगरसेवक विलास जोशी यांनी आपल्या भाषणातून सर्व मुस्लिम बांधवांना पवित्र रमजान महिन्याच्या शुभेच्छा देऊन आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर उपस्थितांना इफ्तार देण्यात आले.या कार्यक्रमामध्ये मोठ्या संख्येत मुस्लिम बांधवांची उपस्थिती होती. त्यामध्ये माजी नगरसेवक अब्दुल नईम,रहेमान तवर, रिजवान तवर,गुड्डू पठाण, अशफाक राजा,शेख इसराइल, अशफाक पटेल , इर्शाद पटेल,तौसीफ शेख,शेर मोहम्मद,शेख सुलतान तसेच मोठया संखेने मुस्लिम बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे संचालन स्वीकृत नगरसेवक रवी कारोटकर यांनी केले तर आभार प्रदर्शन नगरसेवक उमेश कामडी यांनी केले. सागर झोरेसाहसिक News-/24 देवळी