विजयगोपाल येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न…

0

🔥विजयगोपाल येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर संपन्न.

भिडी -/ नाजिकच्या दिनांक 14 रोजी विजय गोपाल येथे जैन मंदिर येथील हॉल मध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर राचे आयोजन करण्यात आले होते या आयोजनामध्ये देवळी पुलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश बकाने यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
देवळी चे तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांच्या मार्गदर्शना खाली हे शिबिर पार पडले
या अभियान अंतर्गत फेरफार चे 135 प्रकरणाचा निपटारा करण्यात आला
तर सातबारा दुरुस्ती मध्ये 13 प्रकरणे करण्यात आली
डिजिटल सातबारा वितरण मध्ये 292 प्रकरणे करण्यात आली
102 आठ अ वितरित करण्यात आली
223 विविध प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले
एक खिडकी व्यवस्थेअंतर्गत 28 अर्ज निकाली काढण्यात आले. 14 कमी जास्त पत्रकाचे प्रकरणात दुरुस्तीची कार्यवाही करून 155 सातबारा अद्यावत करण्यात आले. या शिबिराच्या वेळी देवळी गटविकास अधिकारी प्रफुल्ल लोखंडे तालुका आरोग्य अधिकारी मोमीलवार मॅडम तालुका कृषी अधिकारी मेंढे मॅडम नायब तहसीलदार कावटी साहेब, सजय गांधी निराधार योजनेच्या नायब तहसीलदार जाधव मॅडम, मंडळ अधिकारी नरुले साहेब, मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी, सर्व महसूल सेवक,
वैद्यकीय अधिकारी रक्षदा नितनवरे महावितरण
अभियंता चाफेकर व परिसरातील सर्व तलाठी व अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने उपस्थिती होती
मंडळातील सर्व गावातील नागरिकांची बहू संख्येने उपस्थित होती.

          राजू वाटाणे                        साहसिक News-/24 भिडी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!