दोन विद्यार्थीच्या पाण्यात बुडून मृत्यू पोहण्याचा मोह जीवावर बेतला रायपूरच्या घोगरा धबधबा परिसरातील घटना.

0

वर्धा : धबधब्याच्या सानिध्यात पार्टी तसेच मौजमजा करण्याच्या नादात शाळकरी विद्यार्थीनी आपला जीव गमवाल्याची हदयदावक घटना आज दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रायपूर परिसरातील घोगऱ्यात धबधब्यावर घडली. यात तीन विद्यार्थीपैकी दोघांचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाला तर एका मित्राने मात्र त्यांना मदत करण्याऐवजी तेथून काढता पाय घेतला. सुजल बाबाराव अवताडे (वय १६)रा विनायक शाळेजवळ कारला चौक वर्धा व ओम अनिलराव धुर्वे ( वय १७) रा इंदिरानगर आदिवासी काॅलोनी वर्धा अशी या दुर्घटनेतील मृतकांची नावे आहेत.मिळालेल्या माहितीनुसार वर्धाच्या एका नामांकित शाळेतील दोन विद्यार्थी तसेच त्यांच्या एक मित्र असे तिघे जण पार्टी तसेच मौजमजा करण्याच्या उद्देशाने आज पंचधारा नदी परिसरात आले होते. यावेळी त्यांनी पंचधारा नदीवरील रायपूर परिसरातील घोगऱ्यात धबधब्याची निवड केली. यावेळी त्यांना पाण्यात पोहण्याचा मोह आवरता आला नाही , दुपारी चार वाजताच्या सुमारास यातील एक जण पोहता पोहता अचानक पाण्यात बुडायला लागला. त्याला वाचवण्यासाठी त्याचा मित्र धावला, परंतु तो देखील पाण्यात गंटागळ्या खावू लागला. यावेळी उपस्थित एकाने मात्र त्यांच्या मदतीसाठी प्रयत्न केला. या दुर्घटनेत दोघांचा जाने घटनास्थळीच मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस ठाण्यातील प्रकाश भोयर व अमोल राऊत तत्काळ आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करीत दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. याप्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत.या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ नेहमी दिसून येत असते मात्र, येथील धबधब्याचा मोह आवरता येत नसल्यामुळे येथे बऱ्याच अप्रिय घटना घडल्या आहेत. शासनाने उपाय योजना करून याकडे लक्ष देण्याची गरज असल्याची दिसून येते.

गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज-24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!