धम्म वर्गातील संस्काराने,मुलांचे आयुष्य बदलेल- सुनील बाभळे

0

🔥धम्म वर्गातील संस्काराने,मुलांचे आयुष्य बदलेल- सुनील बाभळे

वर्धा -/ लहानपणापासून मुलांना योग्य संस्कार व दिशा देणे महत्त्वाचे आहे म्हणून धम्म वर्गातील मुलांना सम्यक कर्म , सम्यक वाचा ,सम्यक संकल्प, पंचशील ,अष्टांग मार्ग ,आर्य सत्य , वैज्ञानिक दृष्टिकोन ह्या मूल्यावर संस्कार केले जातात कारण बालकावर होणारे संस्कारच त्यांचे उज्वल जीवन घडवितात .असे प्रतिपादन ऑल इंडिया समता सैनिक दल वर्धा जिल्हा सहसचिव सुनील बाभळे यांनी केले. ऑल इंडिया समता सैनिक दल शाखा समता नगर येथे जेतवन बुद्ध विहार येथे महिला विंगच्या ज्योती भित्रे, चंद्ररेखा भगत, वनिता शेंडे, संध्या चंदनखेडे, कुंता मून ,सुवर्णा बाभळे, रेखा कुत्तरमारे ,किरण रामटेके , सुधा भगत यांच्या वतीने धम्म वर्गातील मुलांना पेन व नोटबुक चे वाटप करण्यात आले. सुरुवातीला धम्म वर्गातील मुलांच्या हस्ते त्रिशरण पंचशील घेण्यात आले. धम्म वर्गातील माही सावंत व त्रिशा पाटील यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणच्या जीवनावर भाषणे दिली. कुंता मुन यांनी 22 प्रतिज्ञांची वाचन केले. सुधा भगत यांनी तथागत भगवान बुद्धांनी सांगितलेला अष्टांग मार्ग समजावून सांगितला व त्यांचं अनुकरण मुलांनी जीवनात केलं पाहिजे असा उपदेश केला. विद्यार्थ्यांनी जीवनात आपले शिक्षण शिकत असताना सम्यक संकल्प व आयुष्य जगताना सम्यक कर्म केले पाहिजे असा उपदेश ज्योती भित्रे यांनी केला. संध्या चंदनखेडे यांनी तथागत बुद्धांच्या जीवनावर प्रकाश टाकून पंचशील चा अर्थ समजून सांगितला. कार्यक्रमाचे संचालन चंद्ररेखा भगत यांनी केले तर आभार पलक बाभळे यांनी मानले.

        ब्युरो रिपोर्ट साहसिक        News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!