नांदोरा (डफरे)येथे स्वच्छतेचा अभाव…

0

ग्रा.सदस्य व गावकऱ्यांनी केली तक्रार.

देवळी / तालुक्यातील नांदोरा (डफरे) या गावांमध्ये स्वच्छतेचा अभाव असून गावातील नाल्या,व रस्ते स्वच्छता होत नसल्याने नाल्या व रस्ते केळकचऱ्याने तुडुंब भरल्या आहे. ग्रामपंचायत कडून गावातील नाल्या व रस्ते स्वच्छ करण्याची जबाबदारी असून सुद्धा ग्रामपंचायतीच्या गलथन कारभारामुळे स्वच्छतेवर दुर्लक्ष होत आहे.याबाबत ग्रामपंचायत सदस्य वैभव डफरे, राजेश अहल्ले,रूपाली दिघडे, वनिता कन्नाके,यांनी गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे.तक्रारीमध्ये गावातील साफसफाई करण्याबाबत पंधरा दिवसाआधी व ग्रामसभेमध्ये सुद्धा समस्या मांडण्यात आली पण याकडे सत्ताधारी सरपंच, व उपसरपंच यांनी स्वच्छतेकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.तसेच गावामध्ये ज्ञानेश्वर माऊली देवस्थानात भागवत कथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यामुळे गावातील स्वच्छता,मंदिर परिसर स्वच्छता,करणे अत्यंत गरजेचे होते पण याची दखल ग्रामपंचायतीने घेतलेली नाही ग्रामपंचायतील ग्रामसेवक यांना सुद्धा वारंवार सांगून त्यांनी कुठल्याही प्रकारची दखल न घेता या आवश्यक कामाकडे दुर्लक्ष केल्याने यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी अशी मागणी ग्रामपंचायत सदस्य व गावकऱ्यांनी केली आहे. गावकरी आपल्या घरासमोरच्या नाल्या व परिसर स्वच्छता करण्याचे काम करीत असल्याचे गावकऱ्यांनी यावेळी गटविकास अधिकाऱ्यांना सांगितले व छायाचित्र दाखविले.सागर झोरे साहसिक न्यूज /24 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!