नांदोरा(ड) येथील सरपंच अंबिका कोचपटे यांनी केला पदाचा दुरुपयोग..

0

🔥काम न करता पती व मुलाला दिली रक्कम.

सासूच्या नावाने दोन वेळा घेतला घरकुलाचा लाभ

नागरिकांची गुन्हे दाखल करण्याची मागणी चौकशीत झाले उघड.

देवळी : तालुक्यातील नांदोरा (डफरे) येथील ग्रामपंचायत सरपंच अंबिका गजानन कोचपटे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून पती व मुलाला कामे न करता नियम बाह्य रित्या रक्कम दिल्याचे पंचायत समितीचे विस्तार अधिकारी दिलीप ढोणे यांनी सादर केलेल्या चौकशी अहवालात उघड झाले आहे.नांदुरा (डफरे)येथील सरपंच अंबिका कोचपटे ह्या २ जानेवारी २०२३ पासून सरपंच पदावर व ग्रामसेवक तृप्ती गावंडे येथे कार्यरत असताना सरपंचाचे पती गजानन कोचपटे यांनी आपल्या पत्नीच्या पदाचा फायदा घेऊन ग्रामपंचायतच्या पैशाची कामे न करता स्वतः व मुलाच्या नावे रक्कम हडप केल्याचे चौकशीत उघड झाले.
नांदोरा ( डफरे )येथील बळवंत सूर्यभान नांन्हे यांनी ग्रामपंचायतच्या पैशाची कामे न करता उचल होत असल्याची तक्रार मुख्य कार्यपालन अधिकारी वर्धा यांच्या कडे तक्रार दिली होती .त्यांच्या तक्रारीवरून सदर चौकशी विस्तार अधिकारी दिलीप ढोणे पंचायत समिती देवळी यांनी केली.चौकशीमध्ये नाली उपसणे या कामाचे पती गजानन कोचपटे यांना ४ हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला .पाणीपुरवठा दुरुस्ती दाखवून मुलगा प्रीतम कोचपटे याला १ हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. पाणीपुरवठा लिकेज कामाकरिता संजय इंगोले याला ४.५.२०२३ ला ४ हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला व परत त्याच तारखेचा दुसरा धनादेश ४ हजार रुपयाचा संजय इंगोले याला देण्यात आला.
९.५.२०२३ ला पाणीपुरवठा रोकड वहीमध्ये नरेश इंगोले याला शौचालयाचा खड्डा उपासन्याचा ५००० रुपयाचा धनादेश देण्यात आला. परत पाणीपुरवठा फंडातून १० हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला. याला लिकेज दुरुस्ती दाखविण्यात आली ,नाली उपसण्याचे काम दाखवून १८.७.२०२३ ला परत ५ हजार रुपयाचा धनादेश आकाश इंगोले यांच्या नावे देण्यात आला.
सासु सिंधुबाई महादेव कोच पटे यांच्या नावे घरकुल असून सुद्धा त्यांना दुसरा घरकुल देऊन घरकुलाचा प्रथम हप्ता १५००० रुपयाचा धनादेश दिला.
नळदुरुस्तीच्या नावे परत २४.८.२०२३ ला १ हजार रुपये खर्च दाखवून पैसे देण्यात आले. एकंदरीत ४९ हजार रुपये नियमबाह्य कामे न करता पती मुलगा व सहकाऱ्यांना रक्कम देण्यात आल्या असल्याचे चौकशी सिद्ध झाले आहे .सरपंच अंबिका कोचपटे यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करून ग्रामपंचायत च्या रकमेचा अपव्यय केला असल्याच चे निदर्शनास आले आहे.
पंचायत समिती विस्तार अधिकारी दिलीप ढोणे यांनी चौकशी अहवाल आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगितले या संदर्भात कारवाई करण्याचे अधिकार कलम ग्रामपंचायत अधिनियम ३९/१ व १४/ग नुसार कारवाही करण्याचे अधिकार वरिष्ठांना असून ते या संदर्भात काय कारवाई करतात हे त्यांच्यावर अवलंबून असल्याचे सांगितले.
त्याचप्रमाणे सचिव तृप्ती गावंडे यांनी आपल्या कर्तव्यामध्ये कुसूर केल्याची आढळले आहे. यावर कोणती कारवाई होणार याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

सागर झोरे साहसिक न्यूज /24

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!