नागपूर – कोल्हापूर एक्सप्रेस पंढरपूर वारीसाठी दररोज सुरू करावी.विश्व वारकरी सेना वर्धा जिल्ह्याच्या वतीने मागणी. 

0

🔥नागपूर – कोल्हापूर एक्सप्रेस पंढरपूर वारीसाठी दररोज सुरू करावी….विश्व वारकरी सेना वर्धा जिल्ह्याच्या वतीने मागणी. 

वर्धा -/ दरवर्षी पावधभुमी तिर्थक्षेत्र पंढरपूर वारीसाठी वारकरी विठ्ठल भक्त लाखोंच्या संखेने तिर्थक्षेत्र पंढरपूर येथे विठूरायाच्या दर्शनासाठी जात असतात परंतु भाविकांची सुखकर जाण्यासाठी दैनदिन रेल्वे गाडी उपलब्ध नसल्याने वारकऱ्यांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक ञास सहन करावा लागतो. प्रवास नियोजन ताळमेळ जुळत नाही.. आजघडीला नागपूर कोल्हापूर एक्सप्रेस पंढरपूर वारीसाठी नेहमी करता दररोज सुरू करावी. अशी मागणी भारताचे विद्यमान केंद्रीय रेल्वेमंत्री मा. अश्वनि वैष्णव यांना विश्व वारकरी सेना वर्धा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली.नागपूर कोल्हापूर ही गाडी रोज सुरू करावी. रोज गाडी सुरू झाल्यास पंढरपूरला जाण्यासाठी नागरीकांना व वारकऱ्यांच्या सोईची होईल.

          ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!