नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकणार आदिवासी समाजाचा मोर्चा.
तालुका शिवसेनेच्या वतीने लकी जाधव यांचे स्वागत
सिंदी (रेल्वे) : अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांनी आदिवासी समाजाच्या विविध मागणी करिता नाशिक येथून लाँग मार्च सुरू करीत शिर्डी, औंगाबाद, जालना, वाशिम, यवतमाळ व वर्धा येथील आदिवासी समाजाला संघटित करीत आज नागपूर हिवाळी अधिवेशनावर धडकणार आहे. राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांची सेलू शहरात प्रवेश होताच शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुक्याच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.धनगर जात किंवा कोणत्याही जातीचा आदिवासी जमातीत समावेश करू नये, धनगरांना आदिवासींच्या सवलती देण्यासाठी स्थापन केलेली सुधाकर शिंदे समिती रद्द करा,पेसा ची पदभरती करण्यात यावी, 2017 ची रखडलेली 12500 पदांची विशेष पदभरती करण्यात यावी, माननीय सुप्रीम कोर्टाने बोगस आदिवासींनी खऱ्या आदिवासींच्या बळकावलेल्या जागा रिक्त करून खऱ्या आदिवासींच्या जागा भरण्यासाठी दिलेल्या 6 जुलै 2017 चे निकालाची अंमलबजावणी करण्यात यावी,एसबिसी मधील कोळी समाजासाठी आदिवासींचा लाभ देण्यासाठी मुख्यमत्र्यांनी स्थापन केलेली समिती बरखास्त करण्यात यावी, वसतिगृहांतील विद्यार्थ्याना आहारासाठी असलेली डी बी टी पद्धत बंद करून पूर्वीप्रमाणे खानावळ सुरू करावी अन्यथा महागाईमुळे दहा हजाराने रकमेत वाढ करण्यात यावी, पंडीत दिनदयाळ स्वयम योजनेचे पैसे विद्यार्थ्याने प्रवेश घेतल्यावर तीन महिने अगोदर मिळावे व त्या रकमेत महागाईमुळे पंधरा हजाराने वाढ करण्यात यावे, पंडीत दिनदयाळ स्वयम योजनेचा पैसा आदिवासी विभागातून धनगरांच्या विद्यार्थ्याना देण्यात येऊ नये,शबरी वित्त व महामंडळ नाशिक यांच्याकडून राज्यातील आदिवासी बेरोजगार तरुणांना व्यवसायासाठी दहा लाख रुपये पर्यंत बिनव्याजी कर्ज देण्यात यावे, ज्या आदिवासी कलाकारांनी नृत्य, कलापथक यांनी आदिवासी जमातींची ओळख, कला, अस्मिता,परंपरा टिकवून ठेवली त्या कलाकारांना मासिक मानधन सुरू करावे,तालुका ल, जिल्ह्याच्या ठिकाणी आदिवासी मुला मुलींची वस्तीगृह संख्या वाढवावी सांगवी शिरपूर येथील दोनशे चे आसपास आदिवासी मुलांवर झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, मणिपूर चे घटने संदर्भात झालेल्या आंदोलनावेळी सटाणा येथील आदिवासी मुलांवर केलेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे, कंत्राटी पद्धतीचा शासन निर्णय रद्द करावा, जिल्हा परिषद शाळांचा खाजगीकरण रद्द करावेडी लिस्टिंगचे कार्यक्रमाचे माध्यमातून आदिवासी समाजात भांडण लावून फूट पाडण्याचे कार्यक्रम रद्द करावे व आदिवासींची दिशाभूल करणारे कार्यक्रम वर बंदी घालण्यात यावी अशा विविध मागणी करिता अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव आदिवासी समाजाला घेऊन थेट नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशनात थेट धडक देणार आहे. सेलू शहरात लकी जाधव यांचे आगमन होताच महाराजा संग्राम सेना सेलू तालुक्यातील हर्षल आहके ,देवेंद्र उईके, रोशन कारनाके, सूरज, आडे, किशोर उईके, शंकर शेडमाके, गणपत भेलावी, निकिता वाडवे, गणेश युवानाथे, राहील अत्राम, देवेंद्र उईके, विलास वलके, विकास वलके, यांनी सेलू येथील बस स्टॉप चौकात स्वागत केले.अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष लकी जाधव यांचे स्वागत शिवसेना सेलू तालुक्याच्या वतीने सुद्धा करण्यात आले यावेळी उप जिल्हा प्रमुख सुनील पारसे, तालुका प्रमुख अमर गुंदी, सेलू शहर प्रमुख प्रशांत झाडे, तालुका समन्वयक योगेश ईखार, उप शहर प्रमुख पिंटू पराते, अजित इरपाते,अतुल काकडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिनेश घोडमारे साहसिक न्यूज-24