नागपूर -/आंबेडकर जयंती निमित्त रात्री सुमारे 11:30 वाजताच्या सुमारास माटे चौक येथे भीम जयंती साजरी करण्यासाठी रोशनी भैसारे मेहरे, गिरीश वाल्दे व इतर कुटुंबीय उपस्थित होते. त्यावेळी सार्वजनिक ठिकाणी नृत्य सुरू असताना सर्वजण सहभागी झाले होते.
याच दरम्यान सीमा दहिकार बागडे ,रंजना शेंडे व आरती धारगावे या एकमेकींना इशारे करत संबंधितांना मुद्दाम धक्काबुक्की व लाथाबुक्क्यांनी त्रास देत असल्याचे दिसून आले. रोशनी मेहरे व तिच्या भावाने सुरुवातीला हा प्रकार दुर्लक्ष केला व जागा बदलून दुसरीकडे नृत्य करण्याचा प्रयत्न केला. तथापि, संबंधित महिलांनी आपल्या गटासह पुन्हा त्या ठिकाणी जाऊन धक्काबुक्की सुरूच ठेवली. परिस्थिती शांत करण्यासाठी रोशनी मेहरे यांनी तेथून निघण्याचा प्रयत्न केला असता, रंजना शेंडे हिने त्यांचा हात पकडून मुरगाळला, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली.यानंतर रोशनी मेहरे व त्यांचे कुटुंबीय गोपाल नगर येथील घरी गेले. मात्र तेथेही रंजना शेंडे, सीमा दहिकार, युवराज शेंडे व आरती धारगावे येऊन शिवीगाळ केली. तसेच युवराज शेंडे यांनी “पेट्रोल टाकून सगळ्यांना जाळून टाकीन, व वस्तीतील पोरांना बोलावून त्यआला संपवतो” अशी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, गिरीश वाल्दे यांचा जुना मालमत्तेचा वाद असून संबंधितांनी त्या जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप आहे. याच वादातून पूर्वनियोजित कट रचून त्यांच्यावर उलट एका महिलेला मारहाण केल्याचे खोटे आरोप लावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली असून, स्वतःला समाजसेविका म्हणवून घेणाऱ्या नीलिमा डंभारे हिच्यावरही आरोप करण्यात आले आहेत. ती तेथील मंडळी जमा करून कट रचणे, त्यांना भडकावणे तसेच संबंधित लोकांना विहारात जाण्यास मनाई करण्यास प्रवृत्त करत असल्याचा आरोप असून, या संपूर्ण प्रकारात तिचाही सहभाग असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून राणा प्रताप नगर पोलिसांकडून तपास सुरू आहे संबंधित विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी सुरू आहे.