🔥आर्वी-शिरपूर- टाकरखेड रस्त्याच्या बांधकामाची चौकशी होणे अतिशय आवश्यक : अरविंद लिल्लोरे.
आर्वी -/ वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात येत असलेल्या आर्वी-शिरपूर-टाकरखेड रस्त्याचे बांधकाम सुरू असून, ते निकृष्ठ दर्जाचे होत आहे. करिता रस्त्याच्या बांधकामाची चौकशी करून संबंधित इंजीनियर वर व अधिकार्यांवर कार्यवाही करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन आर्वी तालुक्यातील ग्राम नांदपूर येथील नागरीक अरविंद लिल्लोरे यांनी माननीय उपविभागीय अधिकारी, आर्वी यांच्या मार्फत, माननीय जिल्हाधिकारी, वर्धा यांना आज दिनांक एप्रिल 21 ला दिले.
रस्त्याचे सुरू असलेले बांधकाम हे संबंधित विभागाच्या अभियंताच्या देखरेखीखाली होत नसल्याचे दिसून येते. संबंधित विभागाचे अधिकारी व अभियंता या बांधकामाकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे, असा परिसरातील लोकांचा व अरविंद लिल्लोरे यांचा आरोप आहे.
रस्त्याचे निकृष्ठ दर्जाचे बांधकाम होणे म्हणजे, शासनाचा कोट्यवधी रुपयांचा निधी व्यर्थ घालविण्यासारखे आहे. त्यामुळे निकृष्ठ दर्जाच्या रस्त्याच्या बांधकामावर अंकुश लावणे, हे शासनाला अतिशय आवश्यक आहे. असे अरविंद लिल्लोरे पत्रकारांशी बोलताना म्हणाले.
एखाद्या रस्त्याचे बांधकाम उत्कृष्ट करायचे की निकृष्ठ, हे फक्त संबंधित विभागाच्या इंजीनियर वर व अधिकार्यांवर अवलंबून असते. त्यामुळे निकृष्ठ दर्जाच्या बांधकामाकरीता, संबंधित विभागाचे अधिकारी व इंजीनियर, हे सर्वस्वी जबाबदार आहे, लिल्लोरे पुढे म्हणाले.