औरंगाबाद,पैठण -/तालुक्यात जेसपिनर,पिमपळवाड़ी ही मोठी बाजारपेठ आहे.महाराष्ट्र सरकारने बंदी घातलेला गुटखा व सुगंधी तंबाखू विक्री करणार्या माफियांनी अक्षरशः हैदोस घातला असून या अवैध चालणार्या गुटका धंद्या विषयी अन्न, औषध भेसळ प्रशासनाच्या काही अधिकारी व कर्मचारी या धंद्याची अत्यंत माहिती ठेवतात प्रत्येक महिन्याला अशा धंद्यावाल्या सोबत संपर्क होतोच अशी माहिती समोर आली आहे गुटखा माफियाशि फोन वर बोलतात त्यांचा वेगळा कोडवर्ड बोलला जातो.यातून अर्थ पूर्ण संबंध जोपासले जात आहे असे बोलल्या जात आहे. व जेसपिनर,पिंपळवाडी,पैठण येथील गुटखा माफिया कडून एक महिना अगोदर पुढील एक महिन्याचा मेवा मिठाई भेट दिली जाते यात काही कर्मचारी व अधिकारी यांमुळे अन्न, औषध भेसळ प्रशासन असून अडचण नसून खोळंबा असून घुटका माफियांना मोठा प्रशासन व राजकिय वरदहस्त असल्याने त्यामुळे कारवाई शून्य.पैठण जेसपिनर,पिंपळवाडी परिसरात दररोज १० ते १५ लाखाची उलाढाल होत आहे मालाची कमतरता आहे,माल भेटत नाही,वरून रेट वाढलेत असे सांगून २२० चा पुडा २६० रुपये घेत आहे.जेणेकरून छोटी व्यापारी ६ रुपयाला राजनिवास गुटखा विकत आहे. पैठण,जेसपिनर,पिंपळवाडी परिसरात कॅन्सर होण्याचे प्रमाण वाढु शकते त्यामुळे शासनाने जेसपिनर,पिंपळवाडी, पैठण गुटखा मुक्त करावे अशी जनतेत चर्चा आहे.