बळीराजाचा खरासखा म्हणून संबोधले जाणाऱ्या पोळा या सणाचे विशेष महत्त्व
- पोळा हा सण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.या सणानिमित्त महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडते.शेतीचे मोठ्या प्रमाणावर यांत्रिकीकरण होऊनही बैलांचे महत्त्व कायम आहे.आपला भारत हा कृषिप्रधान देश आहे शेतकऱ्यांसोबत वर्षभर शेतात फेरफटका मारणाऱ्या बैलांचा पोळा हा सण दरवर्षी श्रावण महिन्यातील पिठोरी अमावस्येला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पोळा सण साजरा केला जातो. ज्यांच्याकडे शेती नाही ते मातीच्या बैलांची पूजा करतात. पोळा सणाच्या आदल्या दिवशी बैलांना आवतन दिल्या जाते. त्यांना ओढ्यावर किंवा नदीवर नेऊन आंघोळ घालतात.देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेले क्षेत्र म्हणजे कृषीक्षेत्र होय.सर्जा-राजा शेतकऱ्याच्या खांद्याला खांदा लावत बाराही महिने शेतात राबणारा बळीराजाचा सखासोबती म्हणजे बैल.याच बैलाच्या बळावर शेतकरी घरी, अंगणी धान्याच्या राशी लावतो. त्याच्याप्रती आभार,ऋण आणि कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे पोळा होय.शहरासह ग्रामीण भागातही पोळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.महाराष्ट्रात दरवर्षी पिठोरी अमावस्येला पोळा सण येतो. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा पोळा हा सण अविभाज्य अंग आहे.आठवड्याभरापासूनच शेतकऱ्यांना पोळ्याचे वेध लागतात.त्याच्या शृंगारासाठी साहित्य खरेदीसाठी बाजार सजलेले असतात. साजशृंगार खरेदीची लगबग सुरू असते.लहान, थोरांपासून घरातील सर्वच सदस्य उत्साही असतात.पोळ्याच्या दिवशी तोरणाखाली उभा असतानाच आपला सर्जाराजा उठून दिसावा यासाठी शेतकरी त्याला सजवत असतो.
गजेंद्र डोंगरे सहासिक न्यूज-24/वर्धा