भटक्या विमुक्त जमातीतील लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरीता तहसील कार्यालय तर्फे एक दिवसीय शिबिराचे आयोजन
वर्धा येथील भटक्या विमुक्त जमातीला लोकांना शासकीय योजनांचे लाभ मिळावा यासाठी तहसील कार्यालय वर्धा तर्फे एक दिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिरात प्रमुख पाहुणे लाभलेले वर्धा जिल्हाचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले वर्धा तहसील कार्यालयाचे उपविभागीय अधिकारी दिपक कांरंडे व तहसीलदार रमेश कोळपे यांच्या अध्यक्षतेखाली निरीक्षण अधिकारी प्रज्वल पाथरे नायब तहसीलदार राजेश्वर मसराम नायब तहसीलदार श्रीमती हेमलता जाधवर नायब तहसीलदार श्रीमती लता गुजर पुरवठा निरीक्षक अधिकारी महेश थेरे महसूल सहायक सचिन हटवार मंडळ अधिकारी सातपुते तलाठी खवास बीएलओ कोरडे, भोंगे, धनवीज श्रीमती रंजना मगगळे ढोरे काॅम्पपूटर ऑपरेटर शुभम रामटेके सुमेध थुल कृष्णा म्हैसकर मनोज राऊत यांच्या उपस्थितीत सानेगुरुजी नगर आर्वी नाका वर्धा येथील साई मंदिर परिसरात पालकवाडी सांजा तील वडार समाजातील झोपडपट्टी व नालवाडी सांजा तील इंदिरानगर झोपडपट्टी व इतर समाजातील नवीन मतदार लोकांना जनजागृती अभियान अंतर्गत मतदार यादीत नाव नोंदणी अर्ज 79 प्राप्त झाले पुरवठा विभागाचे 46 अर्ज प्राप्त झाले संजय गांधी निराधार योजना शहर विभाग येथे 27 अर्ज प्राप्त झाले संजय गांधी निराधार योजना ग्रामीण येथे 7 अर्ज प्राप्त झाले उत्पन्नाचे दाखले 83 प्राप्त झाले व वैद्यकीय तपासणी 113 लोकांची करण्यात आली आहे आणि नवीन नोंदणी अर्ज व दुरुस्ती अर्ज 46 प्राप्त झाले आहे आणि VLM व्दारे 23 अर्ज प्राप्त झाले या शिबिरामध्ये जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी लोकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि तुमच्या समस्या प्रश्न निकाली काढण्यात येईल असे आश्वासन जिल्हाधिकारी यांनी दिले आहे…..
अविनाश नागदेवे जिल्हा प्रतिनिधी साहसिक न्युज 24 वर्धा