भुकंप अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य झटके, भूकंपाची तीव्रता 3. 50 रिक्टर
By साहसिक न्युज 24
ब्युरो रिपोर्ट/ अकोला:
जिल्ह्यातील बार्शी टाकळी जवळ आज सकाळी पावणे सहा वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के जाणवले असून मालमत्तेचे नुकसान वा कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे वृत्त आहे .यासंदर्भात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या वतीने देण्यात आलेल्या माहितीनुसार हवामान विभाग अकोल्याचे वैज्ञानिक सहाय्यक मिलिंद धकीते व कार्तिक वनवे यांनी याबाबत भारतीय सेस्मॉलॉजीकल विभागाच्या अधिकृत संकेत स्थळाच्या आधारे माहिती दिली आहे . त्यानुसार आज सायंकाळी 05:41 मि. 18 सेकंदांनी या धक्क्याची नोंद सह झाली 20.530n व 77.080 या आक्षांक रेखांशावर हे केंद्र असून रिक्टर स्केल व 3.50 इतकी तीव्रता नोंदविण्यात आली . या धक्क्यामुळे कोणतेही नुकसान झाले नसल्याचे वृत्त आहे . असे प्रशासनाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी स्पष्ट केले आहे.