भुमीअभिलेख चे कर्मचारी मस्त आणि बळीराजा त्रस्त
By सहसिक न्यूज 24:
देवळी प्रतिनिधी/सागर झोरे:
देवळी येथील उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्याच्या मनमानी कारभारामुळे देवळी तालुक्यातील शेतकरी शेतमजूर त्रस्त झालेले आहे. शासनाच्या नियमानुसार सकाळी दहा ते सहा कार्यालयाची वेळ ठरून दिलेली आहे.परंतु उपाधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी व अधिकारी हे दुपारी बारा वाजेपर्यंत कार्यालयातच येत नाही कार्यालयात येणाऱ्या जाणाऱ्या शेतकऱ्यांनी जर विचारले तर त्यांच्यासोबत उद्धट भाषेत अपमानास्पद वागणूक देऊन साहेब मिटिंग मध्ये आहे उद्याला या परवाला या असे नेहमी काही ना काही निमित्त दाखवून येणाऱ्यांची दिशाभूल करतात.त्यामुळे देवळी तालुक्यातील शेतकरी त्रस्त झालेला आहे.सध्या शेतजमिनीची मशागत करण्याची धडपड सुरु आहे.तसेच बँकेचे कर्ज काढण्याकरिता तसेच शेती उपयोगी कामासाठी लागणारे अनेक कागदपत्र भुमिअभिलेख कार्यालयातून घ्यावे लागतात,परंतु बळीराजाला या कार्यालयात खालच्या दर्जाची वागणूक मिळत आहे.या प्रकरणी उपअधीक्षक भुमी अभिलेख सहाय्यक कार्यकारी अधिकारी प्रशांत देवघरे यांच्याशी दूरध्वनीवरून कार्यालयात होत असलेल्या प्रकारची माहिती दिली त्यांनी सुरू असलेल्या सर्व प्रकार मी बघतो आणि लगेच कार्यालयात येतो हे सांगून त्यांनी फोन ठेवून दिला आणि तेच दुपारी कार्यालयात एक वाजेपर्यंत आले नाही तेथे जमलेल्या शेतकऱ्याशी संवाद साधल्यावर त्यांनी आपल्या मिळत असलेली अपमानास्पद वागणुकीवरून तीव्र भावना व्यक्त केल्या आणि भूमी अभिलेख कार्यालयाच्या उद्धट कर्मचाऱ्यावर शासनाने कारवाई करावी तसेच कार्यालईन वेळेवर कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याची तंबी द्यावी या कार्यालयातील उपअधीक्षक भुमी अभिलेख मुख्य कार्यकारी अधिकारी पी.एस.भुजाडे यांना कार्यालयात शेतकऱ्यांनी कधीच बघितले नाही तसेच कार्यालयात गेल्यावर बंद दरवाजावर यांच्या नावाची पाटीच दिसते.आता हे कार्यालय रामभरोसे चालू आहे.आणि बळीराजा चे हाल चे बेहाल होत आहे शासनाने याकडे जातीने लक्ष द्यावे अशी मागणी तालुक्यातील संतप्त शेतकरी करीत आहे.
संतप्त शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया-
मी उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मागील चार महिन्यापासून माझ्या शेताची क परत मिळविण्यासाठी सतत चकरा मारत आहे.परंतु मला उडवाउडवीचे उत्तर देऊन वेळ मारून नेत आहे.या प्रकारा मुळे मी त्रस्त झालेलो आहे.शासनाने या उर्मट कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी अशी मी शासनाला मागणी करतो. गजानन पिपरे,शेतकरी देवळी.
मला शेत मोजणी करिता उपाधिक्षक भुमी अभिलेख कार्यालयात गेलो असता शेत मोजणी विषयी कोणती कागदपत्रे लागतात इतकेच विचारले असता कार्यालयातीलया कर्मचाऱ्यांनी माझ्यासोबत उद्धट भाषेत बोलून सध्या कार्यालयात कर्मचारी यायचे आहे ते आल्यावर तुम्ही या परंतु दुपारचे बारा वाजून राहिले परंतु ते का नाही आले असे विचारले असता,कार्यालयातून चालते व्हा तुम्हाला काही कामधंदे नसते का अशा भाषेत मला वागणूक दिली अशा कर्मचाऱ्यावर शासनाने कारवाई करावी.
शेखर वानखेडे,शेतकरी देवळी.
उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात मी मागील दोन महिन्यापासून सतत चकरा मारत आहे कधी तो कर्मचारी उपस्थित नाही,तर कधी तो अधिकारी उपस्थित नाही,तर कधी साहेब नाही आले अशी उत्तरे देऊन फक्त एका कागदासाठी सतत चकरा मारायला लावत आहे.मला मिळत असलेली वागणूक अतिशय खालच्या दर्जाची आहे व माझ्यासारखे अनेक शेतकरी बांधव या वागणुकीचे शिकार झाले आहे शासनाने या उर्मट कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करावी व बळीराजाला न्याय मिळवून द्यावा.
कृष्णकांत शेंडे,शेतकरी देवळी.