महागाईचा भडका, रोखणार कोण ?
by सहासिक न्यूज 24
वर्धा /प्रतीनिधी:
खाद्यतेलासह किराणा माल आणि भाजीपाल्याच्या दरात वाढ झाल्याने सामान्य माणसाच्या खिशाला झळ पोहचली आहेय. शंभर रुपयात मिळणारे खाद्य तेल आता दोनशेला जाऊन भिडलेय, किचन मध्ये पोहचणाऱ्या किराणा मालाचे दर वाढले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्याने महागाई वाढली असल्याचे सांगितले जात आहेय. पण वाढत्या महागाईवर सतत निवडणुका लढणारी सरकारे यावर नियंत्रण मिळविणार काय? असाच प्रश्न उपस्थित होत आहे.
किराणा दुकानात पोहचणारे ग्राहक किराणा घेताना वेगवेगळ्या वस्तूंच्या किमती विचारतात, आणि दररोज वाढणारे दर ऐकूण अवाक होतात.
भाव वाढीमुळे स्वयंपाक घरातील अनेक महिलांच्या नियोजनात तफावत आली आहे.
सोयाबीन तेलाची किंमत पूर्वी किलो मागे 100 ते 130 रुपये दरम्यान होती. ती आता 180 रुपये किलो पर्यत येऊन पोहचली आहे. सोयाबीन तेलाने पेट्रोल दाराला देखील मागे सोडले आहे. या तुलनेत शेतकऱ्याने पिकविलेल्या सोयाबीनला मात्र सहा ते सात हजार रुपयांच्या घरातच दर मिळत आहे. याशिवाय किराणा दुकानातील साबणाचे दर वाढले आहे, बिस्कीट सारख्या वस्तूच्या किमती वाढवून एका पुड्यातील संख्या देखील कमी करण्यात आली आहे. विविध वस्तूच्या किमती जागतिक परिणामाने वाढल्या की व्यापाऱ्यांच्या साठेबाजीमुळे असाच प्रश्न आता सर्वसामान्य माणसाच्या स्वयंपाकघरात निर्माण झाला आहे.
किराणा मालाचे दर वाढले यामुळे केवळ ग्राहकांचीच चिंता वाढली असे नाही. तर किराणा दुकानदार देखील वाढत्या महागाईमुळे त्रस्त झाले आहेत.
सध्याचे किराणा दर
तूर डाळ – 100 रु प्रति किलो
सोयाबीन तेल – 180 रु प्रति किलो
साबण – 33 रु प्रति नग
चना डाळ – 68 रु प्रति किलो