महिलांच्या एकजुटीनेच अनेक कामे शक्य – डॉ पराडकर
प्रतिनिधी / वर्धा :
जागतिक महिला दिनी आयटक वर्धा जिल्हा च्यावतिने आयोजित महिला कामगारांचे प्रश्न – जागतिक महिला दिन आयटक कामगार केंद्र वर्धा येथे भारतीय महिला फेडरेशनचे व्दारका इमडवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला .
कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ राज पराडकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पुजन व दिपप्रज्वलन करुन उदघाटन केले . ते पुढे म्हणाले महिलांच्या एकजूटीने अनेक कामे शक्य होतील असे प्रतिपादन केले
मुख्य वक्ते आयटक राज्य उपाध्यक्ष काँ दिलीप उटाणे यांनी मुलभूत हक्का पासून वंचित ठेवून महिलांचा गौरव दिखावा असल्याचे मत व्यक्त केले.
तेपुढे म्हणाले ८ मार्च आले की महिलाचा तोंड भरुन गुणगौरव केला जातो . देशभरात विविध क्षेत्रात लाखो महिला काम करतात त्यांचे विविध प्रश्न कायम आहे. नुकताच कोरोणा हा मोठा संकट टाळण्यासाठी आशा गटप्रवर्तक , अंगणवाडी.कंञाटी नर्सेस .अंशकालीन स्त्री परिचर , उमेद वर्धीनी शालेय पोषण कर्मचारी ,योगा महिला कर्मचारी ,राष्ट्रीय आरोग्य अभियान .यांचे अनेक प्रश्न कायम आहेत.
राज्यकर्ते ८ मार्च आला कि मोठे मोठे कार्यक्रम घेवून महिलांसांठी खोटा दिखावा करतात.आपले आमदार खासदारांनी या महिलाचे अनेक निवेदन घेतले एकतरी प्रश्न लोकसभेत विधानसभेत ठेवून न्याय मिळवून दिला का? महिलांनी आत्मचितंन करण्याची गरज आहे .अशा खोटारड्या कार्यक्रमात आपली हजेरी लावणे किंवा त्यांचा सत्कार स्विकारणे योग्य आहे का? महिलांना कागदाचा तुकडा देवून केंद्र व राज्य सरकार फसवतो आहे. त्यांचा अपमान करतो आहे असे माझे स्पष्ट मत आहे .महिला विषयी योग्य कृती करुन त्यांचे मुलभूत हक्क मान्य करा.कायदा करा तरच महिला विषयी बोलण्याचा अधिकार .
महिला कामगारांच्या लढ्यातून आंतरराष्ट्रीय महिला दिवस मिळाले आहे कुणाची मेहरबानी नाही.
आरोग्य विभागात गाव पातळीवर काम करणारी अंशकालीन स्त्री परिचरांना केंद्र सरकार महिन्याला फक्त १००/-देते लाजवाटली पाहिजे.महिला दिनी मोठ्या मोठया गोष्टी आपले लोक प्रतिनिधी काय करतात .याला दोषी आपण सुध्दा आहात .जागतिक महिला लढ्याचे महत्त्व सांगितले .विविध उदाहरण देवून योजना महिला कामगारांच्या मुलभूत हक्क मिळविण्यासाठी संघर्ष मजबूत करा.असे आवाहन काँ उटाणे यांनी केले.
मृणाल ढोक RNO , आरती करंजेकर सामाजिक कार्यकर्त्या यांचा सत्कार करण्यात आला.
पमुख पाहुणे म्हणून आयटक जिल्हा सचिव वंदना कोळणकर, विजया पावडे , अरुणा खैरकार , ज्योषना राउत, वंदना खोबरागडे , शबाना खान, डॉ संदिप नखाते, विजय जांगडे नंदकुमार वानखेडे यांची उपस्थिती होती.
स्वाती झोपाटे , कोमल कोल्हे , सुषमा ढोक , प्रगती मेंढे , शुभांगी बागडे , दोपदी वानखेडे.यांनी सांस्कृतीक कार्यक्रम सादर केले.तर आमरपाली बुरबुरे , उज्वला नाखले , अरुणा नागोसे , माया तितरे, यांनी गीत सादर केले
स्वागत संचालन सोनाली पडोळे यांनी तर आभार शुभांगी बांगडे यांनी केले.