माजी नगरसेवकासह रेती तस्करावर महसूल प्रशासनाची धडक कारवाई.
हिंगणघाट : ११ ऑक्टोम्बर रोजी तालुक्यात महसूल प्रशासन तसेच पोलीसांनी कारवाई करूनही रेती माफिया अवैध रेतीचोरीचा गोरख धंदा सुरुच असल्याचे दिसून येत आहे.
आज ११ ऑक्टोंबर रोजी महसूल प्रशासनाला मिळालेल्या माहितीवरून तालुक्यातील मौजा पारडी येथील रेती घाटावर गुप्तपणे धाड टाकून अवैधपणे रेती वाहतूक करणाऱ्या २ ट्रॅक्टर वर कारवाई केली.
सदर दोन्ही ट्रॅक्टर जप्त करून स्थानिक तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यात आले.
अवैध रेती व्यावसायिक मनोज सायंकार व माजी नगरसेवक सोनू गवळी अशी ट्रॅक्टर या मालकांची ओळख आहे.
त्यांच्यावर प्रत्येकी १ लाख २३ हजार १०० रु असा एकूण २ लाख ४६ हजार २०० रुपये एवढा दंड आकारण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार सतीश मासाळ यांनी दिली.
सदर कारवाई तहसीलदार सतीश मासाळ व नायब तहसीलदार सागर कांबळे यांनी केली.
ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज-24 हिंघणघाट