माणिकवाड्या जवळ डांबरी रस्त्यावर पडले मोठे भगदाड,सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकरण अवस्थेत

0

🔥माणिकवाड्या जवळ डांबरी रस्त्यावर पडले मोठे भगदाड,सार्वजनिक बांधकाम विभाग कुंभकरण अवस्थेत

साहुर -/ आष्टी तालुक्यातील साहूर ते माणिकवाडा हा रस्ता डांबरीकरणाचा असून माणिकवाड्याच्या अलीकडेच एका पुलावर मोठे भगदाड पडले असून हे भगदाड शंकरराव खवशी यांच्या शेताजवळ आहे हा मोठा खड्डा पडला असुन अपघात होण्याची शक्यता टाळता येत नाही हे भगदाड गेल्या अनेक दिवसापासून पडले असून याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे या ठिकाणी हे भागदाड अपघात होण्यास कारणीभूत ठरू शकतो अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांनी दीली आहे सार्वजनिक बांधकाम विभाग हे याकडे दुर्लक्ष करीत असून प्रवाशांवर मोठे संकट येण्याचे नाकारता येत नाही या रस्त्यावर मोठी वाहतूक असून रात्रीच्या वेळी जर चालकाला हा खड्डा दिसला नाही तर मोठा अपघात होऊ शकतो म्हणून हा खड्डा लवकरात लवकर बुजवून घ्यावा अशी मागणी नागरिक करत आहे जर हा खड्डा बुजविला नाही तर आक्रमक पाऊल उचलण्याची तयारी माणिकवाडा येथील नागरिकांनी व्यक्त केलेली आहे हे विशेष

शरद वरकड साहसिक News-/24 साहूर 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!