🔥बच्चू कडू यांचा वाढदिवस सेवा उपक्रमांनी साजरा,दिव्यांगांना कपडे, चादरींचे वाटप; गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव
सेलू -/ येथील प्रहार अपंग क्रांती संघटना यांच्या वतीने दिव्यांगांचे कैवारी आमदार बच्चू कडू यांचा वाढदिवस सोमवारी (दि. ६) मोही येथील ग्रामपंचायत कार्यालयात विविध समाजोपयोगी उपक्रमांनी साजरा करण्यात आला.यावेळी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दिव्यांग लाभार्थी सुमित अरविंद मोहर्ले (मोही) व शशिकांत जाधव (हिंगणी) यांच्या राहत्या घरी भेट देऊन त्यांना कपडे व चादरींचे वाटप केले. तसेच गरजू दिव्यांग बांधवांप्रती सामाजिक बांधिलकी जपत मदतीचा हात दिला.
याशिवाय प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करत कोणत्याही शिकवणी वर्गाचा आधार न घेता दहावीच्या परीक्षेत ६९ टक्के गुण मिळविणाऱ्या सुमित चव्हाण याचा प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील मिश्रा यांच्या हस्ते कपडे भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थितांनी त्याच्या जिद्दीचे कौतुक करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला मोही ग्रामपंचायतीचे सरपंच अमर धोटे, ग्रामसेवक रमेश शेंडे, प्रहार अपंग क्रांती संघटनेचे तालुकाध्यक्ष सुनील मिश्रा तसेच दिव्यांग बांधव बबन वाल्दे, संजय समर्थ, दामू मोहदुरे, प्रकाश गोत्रे, मदन कोल्हे, दिनेश कुंभलकर, सुनीता वानोडे, चचानेताई, साहिल नक्षिणे आदी उपस्थित होते.