यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिडी येथे यशवंत सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत विभागीय स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न.
देवळी : तालुक्यातील भिडी येथील लोकनेते माजी आमदार प्राध्यापक सुरेश देशमुख यांच्या अमृतमहोत्सव कृतज्ञता वर्ष 2023-24 यशवंत ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा द्वारा आयोजित यशवंत सांस्कृतिक महोत्सव विभागीय स्पर्धा 13 डिसेंबर रोजी यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भिडी झोन क्र. 3 येथे विविध स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी महाविद्यालयांच्या प्राचार्य.उर्मिला मसराम उपस्थित होत्या तर प्रमुख अतिथी म्हणून पुस्तक दोस्ती चळवळीचे प्रणेते प्रा. सचिन सावरकर परीक्षक म्हणून प्रा.मधुकर साटोने विकास कनिष्ठ महाविद्यालय कानगाव तसेच यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विजय गोपाल येथील पर्यवेक्षक अनिल ढांगे सर, यशवंत विद्यालय सोनोरा येथील मुख्याध्यापक सन्माननीय जयस्वाल यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नाचणगाव येथील प्राचार्य नूतन माळवी तसेच ज्येष्ठ शिक्षक देशमुख सर, यशवंत विद्यालय अंदोरी येथील ज्येष्ठ शिक्षिका काळबांडे यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्री आई फुले तसेच संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रद्धेय दाआजी उर्फ बापूरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली.
सर्वप्रथम रांगोळी स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,निबंध स्पर्धा,व वक्तृत्व स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे आयोजन आज करण्यात आले होते.उद्घाटनाप्रसंगी प्रा.सचिन सावरकर यांनी विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाचे महत्त्व याविषयी विस्तृत माहिती दिली.तसेच स्पर्धेचे परीक्षक प्रा साटोने यांनी सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आजच्या धकाधकीच्या जीवनात स्पर्धेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
प्राचार्य मसराम मॅडम यांनी आजच्या स्पर्धेविषयी मनोगत व्यक्त केले.
तसेच सर्व स्पर्धेच्या परीक्षण केल्यानंतर यशस्वी प्रथम व द्वितीय विद्यार्थ्यांना शिल्ड व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा.अरविंद राठोड यांनी केले.यावेळेस या स्पर्धेमध्ये सहभागी असलेल्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांनी उपस्थिती दर्शवून स्पर्धेमध्ये उस्फूर्तपणे सहभाग दर्शविला.सागर झोरे साहसिक न्यूज-24