९४ लक्ष ३८ हजार रुपयांच्या विकास कामाचे होणार भूमिपूजन. ग्रा.रत्नापूर येथे विविध विकास कामाचे खा.रामदास तडस यांच्या हस्ते होणार भूमिपूजन.
देवळी /सोमवार २६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता रत्नापूर येथे खा.रामदास तडस यांच्या हस्ते तसेच त्यांच्या विशेष सहकार्याने रत्नापूर ग्रामपंचायत अंतर्गत ९४ लाख ३८ हजार रुपयाच्या विकास कामाचे भूमिपूजन पार पडणार आहे.यावेळी मुख्य अतिथी म्हणून वैशाली येरावार माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष,सुनील गफाट,मिलिंद भेंडे, राजेश बकाने,राजेंद्र रोकडे,सरपंच सुधीर बोबडे,उपसरपंच सौरभ कडू, आदी लोक उपस्थित राहणार आहे.
रत्नापूर मध्ये सिमेंट रोड साठी तीस लक्ष रुपये,महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत उद्धमिता भवनाचे बांधकाम २२ लाख ४४ हजार रुपये,समशान भूमीचे सौंदर्यकरण नऊ लक्ष रुपये, ग्रामपंचायत भवना करिता सौरक्षण भीतीचे बांधकाम आठ लक्ष रुपये, ग्रामपंचायत परिसरात सभागृहाचे बांधकाम सात लक्ष रुपये,जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वर्ग खोल्याची दुरुस्ती सहा लक्ष रुपये, रस्त्याच्या बाजूला पेव्हिंग ब्लॉक बसविणे पाच लक्ष रुपये,प्राथमिक शाळेचे शौचालयाचे बांधकाम चार लाख ७५ हजार रुपये,तसेच भूमिगत नालीचे बांधकाम दोन लाख १९ हजार रुपये असे एकूण ९४ लाख ३८ हजार रुपयांच्या विकास कामाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.यावेळी जास्तीत जास्त लोकांनी उपस्थित राहावे अशी विनंती रत्नापूरचे सरपंच सुधीर बोबडे,उपसरपंच सौरभ कडू, ग्रा. सदस्य देविदास वाघ,सुनीता सडमाके,विद्या ठाकरे,रेखा कुंभारे,छाया सोनवणे,आयुब अली,किशोर मुडे, आदी लोकांनी विनंती केली आहे.