सिंदी (रेल्वे) : राष्ट्रीय सेवा योजना+2 स्तर राज्यस्तरीय शिबिरात नागपूर विभागाने विविध उपक्रमात व स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून सर्व विभागात उत्कृष्ट विभाग म्हणून गौरविण्यात आला.शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग पुणेच्या वतीने अमरावती विभागातर्फे राज्यस्तरीय व अमरावती विभाग स्तरीय शिबिराचे आयोजन 3 ते 5 फेब्रुवारी 2024 दरम्यान विवेकानंद आश्रम हिवरा जिल्हा बुलढाणा येथे आयोजित करण्यात आले होते. शिबिराच्या समारोप प्रसंगी अमरावती शिक्षण विभागाचे सहाय्यक संचालक सिद्धेश्वर काळुसे व विवेकानंद आश्रम हिवरा चे अध्यक्ष आर बी मालपाणी यांच्या शुभहस्ते 5 फेब्रुवारी रोजी सन 2021-22 विभागीय उत्कृष्ट कार्यक्रम अधिकारी म्हणून स्व सौ रमाबाई वझुरकर नगर कनिष्ठ महाविद्यालय सिंदी रेल्वेचे प्रा. रवींद्र गुजरकर तर 2022-23 करिता जयदुर्गा कनिष्ठ महाविद्यालय गौरनगर जिल्हा गोंदिया चे प्रा. भूवेंद्र चव्हाण तसेच 2021-22 विभागीय उत्कृष्ट रा से यो स्वयंसेवक म्हणून वर्ध्याची कु. प्रगती प्रभाकर उईके तर 2022- 23 करिता अभिनव भाऊराव गिरडे चिमूर जिल्हा चंद्रपूर यांना बक्षीसे प्रदान करून भव्य सत्कार करण्यात आला. विभागाचे नेतृत्व नागपूर विभागीय समन्वयक प्रा विलास बैलमारे व वर्धा जिल्हा समन्वयक प्रा रवींद्र गुजरकर यांच्या समवेत नागपूर विभागातून वर्धा, गोंदिया व चंद्रपूर जिल्ह्यातून 11 विद्यार्थी व 3 कार्यक्रम अधिकारी सहभागी झाले होते.शिबिरात वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, प्रश्नमंजुषा, चित्रकला स्पर्धा, समूहगीत गायन स्पर्धा व पथनाट्य स्पर्धा या सर्व स्पर्धांमध्ये नागपूर विभाग उत्कृष्ट विभाग म्हणून गौरविण्यात आले. याकरिता मनोहरभाई पटेल कनिष्ठ महाविद्यालय देवरी जिल्हा गोंदिया चे प्रा. प्रदीप रामटेके व ज्ञान भारती कनिष्ठ महाविद्यालय देवळी च्या प्रा. वैशाली ठाकरे यांनी अथक परिश्रम घेतले. शिबिरात कोमल शितले, दीप्ती इंदुलकर, दीपिका देशमुख, कल्याणी राऊत, तनवी लोखंडे, करिष्मा बरांगे, अविश मंडल, आर्यन मुडे, रितेश बुटे, साहिल करलुके व वेदांत गिरडे यांनी विविध स्पर्धांमध्ये नागपूर विभागाचे नाव उंचावले. यशस्वी कार्यक्रम अधिकारी व स्वयंसेवकांचे नागपूर शिक्षण उपसंचालक उल्हास नरड व सहाय्यक संचालक दिपेंद्र लोखंडे यांनी शुभेच्छा दिल्यात.