आष्टी शहीद /लहान आर्वी येथील शिक्षण घेत असलेल्या ४१ मुला-मुलींनी नव मतदार नोंदणी केली होती.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडनुकीत नव्याने मतदान करण्यासाठी मुला – मुलींमध्ये मध्ये खुशीचे वातावरण दिसुन आले.स्थानिक लहान आर्वी येथील बुथ नंबर २२ आणि २३ मध्ये एकुण २१ नव मतदारांनी मतदानाचा पहील्यांदा हक्क बजावला.यामध्ये मुलींचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले.यावेळी नवमतदारांनी लोकशाही सोहळ्यामध्ये पहील्यांदा मतदान करीत असल्याने देशाची लोकशाही अधिकाधीक बळकट व्हावी हा उद्देश असल्याचे सांगितले.यावेळी लहान आर्वी येथील बुथ नंबर २२ आणि २३ मध्ये माधवी कुथे,शिवानी मख, आकांक्षा मख, रसिका गायकी, स्नेहल गायकी, समीक्षा होले, रुपाली घाटे, ईश्वरी शेटे, तन्वी इंगळे, शिवानी होले, वैष्णवी आखरे, मयुरी आखरे,स्वाती सरदार,गोकुल देशमुख, वैभव अकोलकर, रितेश डेहनकर, चेतन श्रखंडे, भूषण श्रीखंडे, रितेश कनेर, प्रतीक नेरकर,अनुज कनेर यांनी पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत मतदान केले.