हिंगणघाट / २३ एप्रिल रोजी हिंगणघाट उमरेड या ठिकाणी जाणाऱ्या बस वर महिला वाहक म्हणून सौ सुवर्णा साठोणे या कर्तव्यावर होत्या त्या वेळी बसमध्ये अनेक प्रवाशी प्रवास करीत होते. त्या दरम्यान हिंगणघाट येथून सिर्सी करीता एक शिक्षक नामे मोहन तिनगासे रा. हिंगणघाट हे शिक्षक म्हणून सिर्सी या गावी प्रवास करीत होते. त्यावेळी महिला वाहक सौ सुवर्णा साठोणे यांनी तिकीट देण्याकरिता त्यांचे कडे गेली असता त्यांनी सिर्सी येथील तिकीट घेण्याकरिता दोनशे रुपयाची नोट महिला वाहकाला दिली प्रवाशी संख्या कमी व पहिलीच सकाळची फेरी असल्यामुळे महिला वाहका जवळ सुटे पैसे नसल्यामुळे ६०रुपये तिकीटचे कापून १००रुपये परत केले व उर्वरित ४०रुपये कर्तव्यप्रमाणे तिकीटच्या मागील बाजूस लिहून दिले व समोरील प्रवाशांना टिकट देण्यास निघून गेले असता सतत मोहन तीनगासे हा शिक्षक महिला वाहकाला अपमानस्पद शब्द वापरायला लागला जेव्हा जेव्हा ती वाहक तिकिटे देत होती तेव्हा तेव्हा तो शिक्षक हुज्जतबाजी घालीत असल्याचे त्या महिला वाहकाने आपल्या तक्रारीत नमूद केले आहे. शेवटी सिर्सी येथे उतरल्यानंतर महिला वाहकाने त्यांना उर्वरित ४०रुपये देण्याचा प्रयत्न केला असता मी तुला बघून घेईल तू चोर आहेस तू चोर आहेस असे मोठमोठ्याने ओरडून जणमाणसात त्या महिला वाहकाची बदनामी केली आपल्या शिक्षकी पेश्याला काळिमा फसण्याचा प्रकार या शिक्षकाने केला. व पैसे नं घेता निघून गेला. परत आल्यानंतर त्या ४० रुपये लिहून असलेल्या तिकटवर एक शून्य वाढवून ४००रुपये करून त्या महिला वाहकाची तक्रार आगार व्यवस्थापक हिंगणघाट यांचे कडे खोटी तक्रार केली शिक्षकाला आपल्या शाळेच्या ठिकाणी मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना तो शिक्षक नेहमी हिंगणघाट वरून जाणे येणे करतो आणि नेहमी कुठल्या ना कुठल्या कारणावरून वाहकाशी चालकांशी वाद घालतो अशी चर्चा खाजगीत बस्थाणकावर सुरु होती. त्या महिला वाहकाला सहन नं झाल्याने आपली एका शिक्षक पेश्यावर असलेल्या व्यक्तीने माझी कुठलीही चुकी नसताना व मला सर्व प्रवशासमोर बदनाम केले असल्याने त्याची तक्रार पोलिसात हिंगणघाट येथे दाखल केली व त्या शिक्षकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्या शिक्षकांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणी सर्व प्रवाशी व कामगार यांनी केली.