वर्ध्यात गट्टूने वार करीत युवकाला जागीच केले ठार

0

याच ठिकाणी हत्या करण्यात आलीBy साहसिक न्युज 24
प्रमोद पाणबुडे/ वर्धा:
घरासमोर बसायला मनाई करताना झालेल्या किरकोळ वादात वडिलांसोबत वाद कां केला,याची विचारणा करणाऱ्या स्टेशनफैलातील राहणाऱ्या आशिष आनंद रणधीर वय२७ याचा रस्त्याच्या बाजूला लावायच्या गट्टूच्या दगडाचे ठेचून निर्घृणपणे खून करण्यात आला. काल रात्री ही घटना घडली.यावेळी झालेल्या हाणामारीत मृत आशिष रणधीर याचे वडील आनंद रणधीर जखमी झाले.त्यांच्यावर उपचार केल्यानंतर त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.या प्रकरणात शहर पोलिसांनी मुख्य आरोपी शुभम जयस्वाल तसेच शुभमचे वडील लक्ष्मीनारायण जयस्वाल यांना अटक केली आहे.तर खुनाचे पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याबाबत शुभमचा मावसभाऊ आदित्य जयस्वाल याला पुरावे नष्ट करण्याच्या आरोपात अटक केली आहे.
हा खुनाचा थरार आनंद रणधीर यांच्या घराजवळ राहणाऱ्या महिलांनी मोबाईलमध्ये चित्रित केला.त्यातून खुनाच्या घटनेतील आरोपींबाबत पोलिसांना सबळ पुरावा उपलब्ध झाला आहे.आज मृत आशिष रणधीर याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.स्टेशनफैलात आनंद रणधीर आणि आरोपी शुभम जयस्वाल यांची घरे जवळजवळच आहे.येथे पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहे.
शुभम जयस्वाल तसेच त्याच्या वडिलाने केलेल्या मारहाणीनंतर आशिष रणधीर रक्तबंबाळ होत घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडून होता.आशिषच्या दोन मित्रांनी त्याला दुचाकीने सेवाग्रामच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचाराकरीता नेले.पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.पोलिसांत याबाबत खुनाच्या कलमान्वये आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुलाच्या खुनाच्या घटनेची तक्रार मृत आशिषचे वडील आनंद रणधीर यांनी शहर पोलिस ठाण्यात दाखल केली.
पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार स्टेशनफैलात आनंद रणधीर आणि लक्ष्मीनारायण जयस्वाल यांची घरे जवळजवळच आहेत.येथे लक्ष्मीनारायण जयस्वाल याच्या घराचे बांधकाम सुरू आहे.तेथे असलेल्या घराच्या ओट्यावर आनंद रणधीर बसले असता त्यांना शुभम जयस्वाल याने शिवीगाळ करीत मारहाण केली.ही घटना आनंद रणधीर यांनी घरी सांगितल्यानंतर त्यांच्या मुलगा आशिष रणधीर याने शुभम जयस्वाल याला या घटनेबाबत जाब विचारला.यात त्यांच्यात वाद झाला होता.त्यानंतर रात्री ९ वाजताच्या दरम्यान आनंद रणधीर तसेच त्यांचा मुलगा आशिष रणधीर,हे लक्ष्मीनारायण जयस्वाल यांच्या घराजवळ उभे असताना तिथे आलेल्या शुभम जयस्वाल याने पुन्हा वाद केला.त्यात शुभम जयस्वाल याने चावूâने आशिष रणधीर याच्या मानेवर चाकूने सपासप वार केले.तसेच सिमेंटच्या गट्टूने त्याला ठेचले.या मारहाणीत लक्ष्मीनारायण जयस्वाल यानेही सहकार्य केले.या जीवघेण्या हल्ल्यात मुलाला वाचवायला गेलेले आनंद रणधीर हेही जखमी झाले तर आशिष रणधीर गंभीर जखमी झाल्याने जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला.तेथेच तो मरण पावला.घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप,शहर पोलिस ठाण्याचे ठाणेदार सत्यवीर बंडिवार सहकाऱ्यासह घटनास्थळी पोहोचले.त्यांनी लगेच तीनही आरोपींना अटक केली.यातील एक आरोपी आदित्य जयस्वाल हा समतानगरातील रहिवासी आहे.त्याने खुनाच्या घटनेचे पुरावे नष्ट केल्याबद्दल त्याला पोलिसांनी अटक केली तर खुनाच्या घटनेत सहभाग असल्याबद्दल शुभम जयस्वाल आणि लक्ष्मीनारायण जयस्वाल यांना अटक केली.पुढील तपास पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर,अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके,उपविभागीय पोलिस अधिकारी जगताप यांच्या मार्गदर्शनात वध्र्याचे ठाणेदार सत्यवीर बंडिवार करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!