वर्ध्यात सात वर्षीय मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न
सहसिक न्यूज 24:
प्रतीनिधी / तळेगाव शा. प.
घरापासुन थोड्या अंतरावर घरचा पाळीव श्वान शोधायला गेलेल्या सात वर्षीय मुलीला चाॅकलेट व आईस्क्रिमचे आमिष दाखवून अपहरण करण्याचा बेत त्या मुलीच्याच समय सुचकतेमुळे फसला. सोमवारला सकाळी ११.३० वाजताचे सुमारास शिक्षक काॅलनीत ही घटना घडली. चिमुकलीच्या वडिलाने दिलेल्या तक्रारीवरून तळेगाव पोलिस ठाण्यात संबंधित अपहरण कर्त्या युवती विरोधात अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तळेगाव येथील शिक्षक काॅलनीत राहणाऱ्या प्रविण करोले यांची मुलगी लक्ष्मी (७) हि तिच्या घरचा पाळीव श्वान बर्याच वेळापासुन दिसला नसल्याने ति काॅलनीत घरापासुन काहि अंतरावर शोधण्यास गेली असता.सोमवार दि. ९ मे सकाळी ११.३० वाजताचे दरम्यान एक अज्ञात युवती अंदाजे वय २० ते २२ सकाळी ११ वाजताच्या दरम्यान शिक्षक कॉलनी मध्ये शिरली व त्याच वेळेच कॉलनीतील राहिवासी कु. लक्ष्मी प्रवीण करोले हिचे घरातील पाळीव श्वान हरवल्यामुळे ती त्याचा शोध घेत होती अश्यातच ती अज्ञात युवती तिच्या जवळ आली व तुझे नाव काय असे विचारले त्या चिमुकलीने लक्ष्मी करोले असे पुर्ण नाव सांगितले असता मी सुद्धा करोले च आहे असे सांगुन चीमुकलीस चॉकलेट आणि आइसक्रीम चे अमिश दिले व गजानन महाराज मंदीर कुठे आहे विचारुन तू माझ्या सोबतच चाल असे म्हणत त्या युवतीने तिचा घट्ट हात धरुन ठेवुन तेथून कोणाला तरी फोन लावला पण वेळीच त्या चिमुकलीने प्रसंगावधान व समय सुचकता दाखवित त्या अज्ञात युवतीच्या हाताला जोरात झटका देत ती तेथून पळुन घरी गेली व घरी येताच घडलेली हकीकत आई व आजीला सांगितली.ही सर्व घटना कॉलनीत लागलेल्या वेगवेगळ्या सी सी टीव्ही कॅमेरात कैद झाली व या गुन्ह्यांची नोंद तळेगाव पोलिसांनी केली असून पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहे