वारकऱ्यांना लागली पंढरीची ओढ…….

0

🔥विदर्भाची पंढरी घोरड मधून निघणार 2 पायदळ दिंड्या.

🔥दिनांक 19 जूनला घोराड ते पंढरपूर.

🔥26 जूनला आळंदी ते पंढरपूर पायदळ दिंडीचे प्रस्थान

सिंदी (रेल्वे), सेलू -/ विदर्भातील पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ,श्री संत केजाजी महाराज, त्यांचे पुत्र श्री. संत नामदेव महाराज यांच्या पद स्पर्शाने पावन झालेल्या घोराड गावामधून आळंदी ते पंढरपूर पायदळ दिंडी व घोराड ते पंढरपूर पायदळ दिंडी अश्या प्रकारे दोन दिंड्या अनुक्रमे 26 जून व 19 जूनला घोराड वरून प्रस्थान करणार आहेत.
घोराड ते पंढरपूर पायदळ दिंडी चे चालक हरी महाराज महाकाळकर असून ही दिंडी वर्धा ,यवतमाळ मार्गाने जाणार आहेत त्यांचे ठिक ठिकाणी मुक्काम, जेवण सर्व नियोजन झाल्याचे व दिंडी मध्ये आतापर्यंत 100 वारकऱ्यांची नोंदणी झाल्याचे त्यांचे सहकारी धनराज झाडे यांनी सांगितले तर स्व. ह.भ.प. बबनराव माहुरे गुरुजी व ह.भ.प. नरेश महाराज पाटील यांनी गेल्या 20 वर्षांपासून चालू केलेली आळंदी ते पंढरपूर माऊली सोबत चालणाऱ्या पायदळ दिंडीचे विणेकरी ह.भ.प. पुरुषात्तम महाराज गुजरकर यांनी या दिंडीत संपूर्ण विदर्भातील 1000 ते 1200 वारकरी राहील ही दिंडी घोराड वरून आळंदी पर्यन्त मोटारीने प्रवास करून माऊली सोबत पायदळ चालणार असल्याचे माहिती दिली.
दोन्ही दिंड्यामध्ये युवा, वारकरी, महिला सहभागी होणार आहे तर या दिंड्या माऊली तुकाराम, राम कृष्ण हरी च्या जयघोषात प्रस्थान करणार आहेत. गावामध्ये वारकऱ्यांना पांडुरंगाच्या भेटीची ओढ लागल्याचे दिसते.

दिनेश घोडमारे साहसिक न्यूज -/24 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!