सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप,संभाजीनगर चितेगाव संघाने पटकावला प्रथम क्रमांक; 

0

🔥सुरगाव येथे कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप,संभाजीनगर चितेगाव संघाने पटकावला प्रथम क्रमांक; 

सेलू -/ सुरगाव येथे श्री संत नानाजी क्रीडा मंडळ, सुरगाव व युवा क्रीडा मंडळ सुरगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कबड्डी स्पर्धेचा उत्साहात समारोप झाला. या स्पर्धेमध्ये विविध गावांतील कबड्डी संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ वर्धा सराफा असोसिएशनचे अध्यक्ष श्री. देविदास करंडे व श्रावण ठाकरे माजी कबड्डीपटू यांच्या हस्ते पार पडला. यावेळी प्रथम पारितोषिक संभाजीनगर चितेगाव संघाला प्रदान करून गौरविण्यात आले.

स्पर्धेतील पारितोषिकांचे स्वरूप पुढीलप्रमाणे होते. प्रथम पारितोषिक 21 हजार रुपये, द्वितीय पारितोषिक 15 हजार रुपये, तृतीय पारितोषिक 10 हजार रुपये व चतुर्थ पारितोषिक 5 हजार रुपये असे ठेवण्यात आले होते.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वैष्णव मेहता, सुरज मारबते, शंतनू धलवार, मंगेश धुर्वे, प्रतीक गायकवाड, रितिक गायकवाड, श्रीकांत कोवे, अविनाश ठाकरे, वैभव वानखेडे, प्रणव मेहता, प्रज्वल खडसे, सौरभ उईके, आर्यन सहाकाटे, चेतन वानखेडे, धीरज सहाकाटे, प्रथमेश उईके, ओम वरठी, आयुष वरठी, गणेश कांबळे, कुणाल गायकवाड, आदर्श गायकवाड, विहान उईके, वेदांत उईके, वंश तीमांडे, आयुष तीमांडे, अंश निधेकर, रोहन दुधकोहळे, पार्थ चौधरी, ओम मडावी, चंदन मेश्राम व नैतिक मेश्राम या खेळाडूंनी विशेष परिश्रम घेतले.

ग्रामीण भागातील युवकांमध्ये क्रीडाविषयक आवड निर्माण व्हावी, खेळाडूंना आपले कौशल्य दाखविण्यास व्यासपीठ मिळावे तसेच गावातील क्रीडा संस्कृतीला चालना मिळावी, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेच्या यशस्वी समारोपामुळे गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

ब्युरो रिपोर्ट साहसिक News-/24 सेलू,वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!