“शिवाजी कोण होता” पुस्तकाचे सामूहिक वाचन वंचित बहुजन आघाडी कडून प्रबोधनाचा ठाम संदेश…

0

🔥“शिवाजी कोण होता” पुस्तकाचे सामूहिक वाचन.

🔥वंचित बहुजन आघाडी कडून प्रबोधनाचा ठाम संदेश.

यवतमाळ प्रतिनिधी -/ यवतमाळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने दिनांक २९ एप्रिल (बुधवार) रोजी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, शिवतीर्थ येथे विशेष वाचन उपक्रम उत्साहात संपन्न झाला. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या सूचनेनुसार आयोजित या कार्यक्रमात कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित “शिवाजी कोण होता” या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.अलीकडेच या पुस्तकाच्या प्रकाशकाला धमकी दिल्याच्या आरोपामुळे राज्यभरात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर,अभिव्यक्ती स्वातंत्र्य, वाचन संस्कृती आणि प्रबोधनात्मक विचारांचा प्रचार-प्रसार व्हावा, या उद्देशाने हा उपक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष, तथा यवतमाळ नगरपालिकेचे गटनेते व नगरसेवक डॉ.नीरज वाघमारे यांनी केले. या उपक्रमात प्रमोद पाटील,विशाल पोले,शैलेश भानवे,अशोक कयापाक,अरविंद दिवे,सचिन मोहोड,केशव भागवत,देवानंद लोणारे,राहुल खंतडे,ऍड.संजीव इंगळे,रामदास वीर,गजानन कोकाटे,स्वप्निल कोल्हे,सुशील भगत,वामन राऊत,रवी बच्छराज,अनिल उमरे,जयंत मडावी आदींसह कार्यकर्ते,विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या उपक्रमातून वाचन संस्कृतीला चालना देण्यासोबतच सामाजिक प्रबोधनाचा ठाम संदेश देण्यात आला.

🔥संजय गायकवाड यांना आव्हान 

यावेळी कार्यक्रमात बोलताना नीरज वाघमारे यांनी शिवसेना (शिंदे गट) चे आमदार संजय गायकवाड यांना खुले आव्हान देत, “यवतमाळमध्ये येऊन छत्रपती शिवाजी महाराज, कॉम्रेड गोविंद पानसरे आणि पुस्तकाच्या प्रकाशकांविषयी अभद्र वक्तव्य करून दाखवावे, त्याचे परिणाम काय होतात ते त्यांनी पाहावे,” असे स्पष्ट शब्दांत आव्हान दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!