तिसऱ्या दिवशी तेलाई घाटाचा परिसर जळून स्वाहा  रस्त्याच्या दोन्हीही बाजूने आगीच्या ज्वाला दोन तास वाहतूक ठप्प .

0

🔥तिसऱ्या दिवशी तेलाई घाटाचा परिसर जळून स्वाहा. 🔥रस्त्याच्या दोन्हीही बाजूने आगीच्या ज्वाला दोन तास वाहतूक ठप्प.

आष्टी शहीद -/                                 (प्रतिनिधी/नरेश भार्गव)

आष्टी तालुक्यातील येणाडा जंगलात आग लागली ती आग सुजातपूर बिट जळल्यावर पुढे पोरगाव्हाण जंगलात पोहचली मग तिसऱ्या दिवशी तीच आग आष्टी ते वरुड या राष्ट्रीय महामार्गांवर तेलाई घाटात पोहचली दुपारचे एक वाजता ती आग रस्त्याच्या दोन्हीही भागात पसरल्याने आगीच्या ज्वाला एवढ्या मोठया होत्या कि एक तास वाहतूक ठप्प झाली होती.

सविस्तर असे कि,

आष्टी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गवर तेलाई घाटात मलकापूर बीटात व तेलाई मंदिर व घाटात जवळ असलेला जंगल जळून स्वाहा झाला. लागलेल्या आगीत मोठं मोठी झाडें जळून जमिनीवर कोसळली. काही भागात लहान रोपे सुद्धा जळून स्वाहा झाली. या घटनेची माहिती बिट गार्ड यांना कळताच त्यांनी चार मजुराणा घेऊन वनविभागाच्या वाहणाने तेलाई घाटात आले तेव्हा त्यांच्या जवळ असलेल्या साधनानी आग आटोक्यात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले मात्र ते आगी समोर निष्फळ ठरले. वनविभागाच्या वाहन चालकांनी दिलेल्या माहिती नुसार लागलेली आग ही मलकापूर बीटात आहे. समोरील नेमके कोणते बिट आहे यांची मात्र चालकाला माहिती नव्हती. दि. 28रोजी दुपारी सहा वाजता महिला बिट गार्ड चार मजुराणा घेऊन जीवाचे रान करीत आग विझविण्यासाठी आटोकट प्रयत्न करीत होती. लागलेली आग एवढी भयानक होती कि काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. लागलेली आग तेलाई मंदिर परिसरात असलेल्या वनपाल च्या कार्यालयातसमोर भागात पोहचली. त्याच शेती ला लागून बगीचा होता त्या बगीचा पर्यत आग लागून काही निंबाची झाडें अगीमुळे भाजली. महिला गार्ड च्या मदतीला वनविभागाचे कोणतेही गस्ती पथक जबाबदार अधिकारी व सहकारी बिट गार्ड धावले नाही. जंगलात लहान रोपे लागवड करण्यासाठी वनविभाग कोट्या वधी रुपये खर्च करतात. लहान रोपांना पाणी देण्यासाठी टँकर चा उपयोग करण्यात येतो मात्र लहान रोपे आगीच्या भक्ष स्थानी सापडल्यावर तेच टँकर बेपत्ता असतात. कोट्याधीश रुपये खर्च करून वन संपदा नस्ट होत असेल तर जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण होतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी चौकशी करून कठोर कार्यवाही करण्याची गरज आहे. याच परिसरात रात्र दिवशी दिसणाररे वाघ, बिबट, अस्वल आदी वन्य प्राणी आगीच्या घटना मुळे सुरक्षित नाही असे चित्र आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!