शेकडो शेतकऱ्यांचा मार्ग झाला मोकळा.
वर्धा: समद्रपूर तालुक्यातील नंदपुर (खुनी) या गावाला लागून असलेला विदर्भ नाला असून त्या नाल्यामधून शेती करण्यासाठी नंदपूर येथील शेकडो शेतकरी ये – जा करावी लागत होती. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत होता.मजबूत पुल रपटा नसल्याने शेतकरी मजुर यांना जाणे येण्याचा मार्ग कसातरी होता तोही कायमचा बंद झाला होता.ही बाब नवीन सरपंच सौ दुर्गा मारोती ढोणे यांचा लक्षात येताच त्यांनी आपल्या ग्राम पंचायत सदस्य सोबत बैठक घेतली आणि दुसऱ्याच दिवशी ग्राम पंचायत सदस्य संकेत हिवंज , संजय टोणपे , रूखमा मनंनें , उज्वला मेंढे, यांनी ही. गोष्ट आपल्या विधानसभेचे कार्यसम्राट आमदार समीर भाऊ कुणावर यांचा कानी टाकली त्यांनी कोणत्या गोष्टीचं विलंभ न करता 3 मोठ्या ढोल्याची वेवस्था करून दिली .आणि अगेच ग्राम पंचायत सरपंच दुर्गा मारोती ढोणे यांच्या देखरेखीखाली नाल्यावर ढोले टाकून शेतकऱ्यांच्या मार्गाचे काम सोयीचे करून दिले. आणि शेकडो शेतकरी बांधवांचा शेतात जाण्या येण्याचं मार्ग सुरू करून दिला. त्यामुळे नंदपूर येथील शेतकऱ्यांना तात्पुरता दिलासा मिळाला असला तरी भविष्य काळात शेतकऱ्यांना सुखाने शेती करण्यासाठी मजबूत पुलाच्या बांधकामाची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
गजेंद्र डोंगरे साहसिक न्यूज -24