शेतकऱ्यांना सरसकट ५०,०००/- रुपये हेक्टरी मदत करा माजी आ.राजुभाऊ तिमांडे व अँड सुधिरबाबु कोठारी यांची राज्यशासनाकडे मागणी
वर्धा जिल्ह्यातील सोयाबीन पिकावर आलेल्या रोगराई मुळे शेतकऱी हवालदिल झाला.तोंडावर आलेले हातचे पिक गेल्यामुळे शेतकरी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. याची जाण करीत व शेतक-यांना न्याय मिळवून देण्याच्या दृष्टीने आज समुद्रपुर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने माजी आमदार राजु तिमांडे व सहकार नेते अँड सुधीरबाबु कोठारी यांचे नेतृत्वात तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नुकसानग्रस्त मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी तहसीलदारांना निवेदन देतांना सोयाबीन पिकावर आलेल्या रोगराई मुळे शेतक-यांचे नुकसानाचे पंचनामे तातडीने करुन त्यांना सरसकट ५०,०००/- रुपये हेक्टरी मदत करावी त्याचप्रमाणे पिकविम्याची रक्कम शेतक-यांचे खात्यावर जमा करावी जेणेकरून शेतक-यांना दिलासा मिळेल.अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.अन्यथा शेतक-यांच्या आक्रोश आला सामोरे जावे लागेल. असा इशारा देण्यात आला.
यावेळी प्रामुख्याने समुद्रपुर बाजार समितीचे सभापती हिम्मतराव चतुर, संचालक अशोक वांदिले, हिंगणघाट शहर राका अध्यक्ष विठ्ठल गुळघाणे, समुद्रपुर खरेदी विक्री उपाध्यक्ष सुरेद्र कुकेकार, मेहेरबाबा पतसंस्था अध्यक्ष नरेंद्र थोरात, समुद्रपुर नगरपंचायत नगराध्यक्षा सौ. योगिता सचिन तुळणकर ,गजानन शेंडे, हिंगणघाट बाजार समिती उपसभापती हरीश वडतकर, हिंगणघाट विधानसभा अध्यक्ष संजय तपासे,हिंगणघाट तालुकाध्यक्ष विनोद वानखेडे,गणेश वैरागडे, पिंटु बादले, अरूणराव झाडे, उद्धवराव कुबडे, शांतीलालजी गांधी, हेमंत पाहुणे, हिंगणघाट खरेदी विक्री अध्यक्ष दिगांबर चांभारे, उपाध्यक्ष राजु भोरे, संचालक नामदेवराव तळवेकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष हरीश काळे, प्रदेश प्रतिनिधी सौरभ साळवे, नगरसेवक प्रदिप डगवार, राजु कटारे,सौ. माया जिवतोडे काकु,शालिकर वैद्य, दिपक पंधरे,रामभाऊ चौधरी, मधुकरराव कामडी, सचिन तुळणकर,माजी नगरसेवक धनंजयभाऊ बकाने, संजय चव्हाण, राजेश धनरेल,सौरभ तिमांडे, रणजीत चावरे, मनीष गांधी, अमित लाजुरकर, अमर झाडे, लिलाधर मडावी,जितु सेजवल,अमोल त्रिपाठी , सुरेद्रभाऊ टेंभुर्णे, विक्रांत भाऊ भगत,व मोठ्या प्रमाणात पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते व हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
राजू गंधारे सहासिक न्यूज-24