शेतातील बैलाचा गोठा व धुराला लावलेल्या आगीत जळुन खाक

0

सहसिक न्यूज 24
देवळी / सागर झोरे :

देवळी तालुक्यातील अडेगाव शिवारात शेतकरी संजय डाफ यांची वडिलोपार्जित चार एकर ओलीताची शेती आहे. शेताला लागुन गौळ येथील शेतकरी बंडु नामदेव बुरांडे याची शेती आहे. बंडु नामदेव बुरांडे यानी त्यांच्या शेतातील धुरे जाळण्या करिता धुराला आग लावली. बंडु नामदेव बुरांडे यानी लावलेली ती आग पिडीत शेतकरी संजय डाफ यांच्या शेतात असणारा बैलाच्या गोठ्याला लागल्याने गोठ्यातील ठेवलेले सर्व शेती साहित्य औजारे जनावरा साठी ठेवलेले कडबा आणि कुठार सर्व जळुन या आगीत खाक झाले. या आगीत पिडीत शेतकरी संजय डाफ यांचे जवळपास पन्नास हजार रूपयाचे नुकसान झाले. बंडु नामदेव बुरांडे यानी आपल्या शेतातील धुराला आग लावताना निष्काळजी पणा केल्यामुळेच शेतातील  बैलाचा गोठा आगीत जळुन खाक होऊन ही घटना घडली असे संजय डाफ यांनी सांगितले. 
याबाबत पिडीत शेतकरी संजय डाफ यांच्या दिलेल्या तक्रारीनुसार देवळी पोलीस स्टेशन नी आरोपी बंडु नामदेव बुरांडे यांच्या विरुद्ध 285 कलम अंतर्गत मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!