सर्वांनी मिळून सण उत्सव शांततेत साजरे करा ..तहसीलदार सचिन यादव .
सर्वांनी मिळून सण उत्सव शांततेत साजरे करा ..तहसीलदार सचिन यादव .
सहासिक न्यूज-24
सागर झोरे देवळी
सप्टेंबर महिन्यात १९ ते २८ या तारखे दरम्यान गणेश उत्सव तसेच ईद-ए-मिलाद हे सण साजरे होत आहे.हे उत्सव हिंदू व मुस्लिम बांधव साजरे करतात यावर्षी देखील हे सण उत्सव सर्वांनी मिळून शांततेत आणि आनंदाने साजरे करूया असे आवाहन देवळीचे तहसीलदार सचिन यादव उपविभागीय पोलीस अधिकारी पवार पुलगाव आणि देवळी पोलीस स्टेशनचे ठाणेदार भानुदास पिदुरकर यांनी केले.सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी समाजात विघातक लोकांचे प्रमाण फार कमी आहे त्यांच्या डोक्यात अस्थिरता निर्माण करणे हाच उद्देश असतो सर्व गणेश मंडळ व नागरिकांनी पोलिसांना सण उत्सवाच्या काळात सहकार्य करावे यापूर्वीसुद्धा नागरिकांच्या सहकार्यामुळे शांतता ठेवून हे सण उत्सव साजरे करण्यात आले होते. यावेळेस सुद्धा त्यांना उत्सव शांततेचे साजरे करण्याचे आवाहन यावेळेस करण्यात आले उपस्थित नागरिकांनी सुद्धा पोलिसांकडून सुद्धा सहकार्य मिळण्याचे विनंती केली.ही शांतता बैठक पोलीस स्टेशन देवळी येथे पार पडली या बैठकीला विविध संस्थांचे प्रतिनिधी गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच माजी नगराध्यक्ष जब्बार तव्वर सेवा सोसायटीचे अध्यक्ष शरद आदमने,दिनेश शिरसागर,जामा मजीतचे सत्तार खा पठाण, जुम्मनभाई ,इत्यादी सह अनेक कांची उपस्थिती होती.