सावकारांचे धाबे दणाणले; मुक्ताईनगर, बोदवडमध्ये सावकारांची झाडाझडती

0

Byसाहसिक न्युज 24
प्रतिनिधी / मुक्ताईनगर :
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा, सालबर्डी व बोदवड या गावांमध्ये अवैधपणे सावकारी करणाऱ्या सावकारांची शुक्रवारी सकाळी ९.३० ते सायंकाळी ४ वाजता दरम्यान, जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई आणि तालुका निबंधक मंगेश कुमार शहा यांच्या नेतृत्वाखाली तब्बल पाच पथकांनी अचानक छापे मारत कारवाई केली. झाडाझडतीत महत्वाचे कागदपत्रे व फायली जप्त करण्यात आल्या. दरम्यान, संबंधितांवर कारवाई होईल का? याकडे दोन्ही तालुक्यांचे लक्ष लागून आहे .
मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथे मारलेल्या धाडीत संदिप कुमार, श्यामसुंदर खंडेलवाल, राजकुमार खंडेलवाल, बळीराम चांगो महाजन, प्रतीक रामनिवास खंडेलवाल, हरी किसन भोई आदींची झडती घेत कुऱ्हा येथील पेट्रोल पंप, जिनिंग, प्रेसींग मधुन साहीत्य व महत्वाचे दस्तावेजही जप्त करण्यात आले आहे. तसेच सालबर्डी येथील प्रदिप भिडे आणि बोदवड येथील वसंत खाचणे, कैलास गोपीचंद आहुजा यांच्याकडे अशा सर्व ठिकाणी अचानकपणे एकाचवेळी टाकण्यात आलेल्या धाडीमुळे अवैध सावकारी करणाऱ्या सावकारांचे धाबे दणाणले आहे. या कारवाईसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

संबंधितांवर कारवाई होईल का?

अचानक झालेल्या कारवाईत महत्वाचे कागदपत्रे व फायली जप्त करण्यात आल्या. असून संबंधितांवर कारवाई होईल का ? अशी चर्चा दोन्ही तालुक्यातील नागरिकांमध्ये सुरु असून याकडे दोन्ही तालुक्यांचे लक्ष लागून आहे. तसेच संबंधितांवर कारवाई झाली नाही तर अचानक छापा टाकण्यात आलेल्या छापाच काय ? असे प्रश्न ही उपस्थित केले जात आहे.

यांनी केली कारवाई

पथकात चोपडा येथील एस गायकवाड, अमळनेर येथील के.पी.पाटील, एरंडोल येथील जी.एच.पाटील, भडगांवचे महेश कासार, चाळीसगावचे चंद्रकांत पवार, पाचोरा येथुन एन के सुर्यवंशी यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!