🔥साहूर गावात गाव सांड्याचा धुमाकूळ,दोन चाकी चार चाकी गाड्या सहित महिलांना धडका.
साहुर,शरद वरकड-/आष्टी तालुक्यातील साहुर गावात गेल्या अनेक वर्षांपासून गाव सांड्याने मोठा कहर केलेला असून चार चाकी दोन चाकी तसेच महिलांना धडका देऊन मोठे नुकसान केलेले आहेत याची तक्रार साहुर ग्रामपंचायत येथे अनेक वेळा करण्यात आलेली होती परंतु त्यावर कुठलाच निर्णय घेत नसल्याने नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झालेली आहे लहान मुलांना विद्यार्थ्यांना महिलांना पाळीव प्राण्यांना या सांड्याने नाकीनव आणल्याने मोठी धास्ती गावामध्ये पसरलेली आहेत उभ्या असलेल्या दोन चाकी गाडीला उचलून फेकल्या जातात तसेच उभी असलेली चार चाकी गाडी दिसताच तिला सुद्धा उचलू दुसऱ्या ठिकाणापर्यंत ढकलात घेऊन जातात त्यामुळे नागरिकांचे मोठे नुकसान झालेले आहेत म्हणून साहुर गावातील नागरिक त्रस्त झाले असून त्याचा बंदोबस्त करण्याची मागणी साहुर गावातील नागरिक करीत आहे जर या सांड्याचा बंदोबस्त केला नाही तर यामध्ये जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा प्रकारची घटना घडू नये म्हणून साहुर ग्रामपंचायत च्या वतीने लवकरात लवकर या सांड्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करीत आहे हे विशेष(क्रमशः)