सिंदी रेल्वे येथील उड्डाणपुलाचे बांधकाम गेल्या नऊ वर्षांपासून रखडलेले, त्या पुलाचे बांधकाम १५ दिवसात सुरू करा अन्यथा सिंदी रेल्वे येथील नागरिक रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करणार
कांढळी ते सिंदी रेल्वे रोडचे काम संथ गतीने सुरू असल्याने ते काम वेगाने करा
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व सिंदी रेल्वे येथील नागरिकांनाचे जिल्हाधिकारी यांना निवेदन
सिंदी (रेल्वे) : शहरात रेल्वे उड्डाणपुलाच्या बांधकामाची मागणी अनेक दशकापासून होत आहे तसेच त्या पुलाची नितांत गरज आहे. त्या अनुषंगाने रेल्वे ट्रॅक वरील पुलाच्या कामाची सुरुवात सन २०१४ रोजी झाली आहे. परंतु आज पर्यंत सदर काम सुरुच असून या कामाला नऊ वर्षांचा कालावधी झाला असून अजून पर्यंत त्या पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. या रखडलेल्या अपूर्ण पुलाच्या कामामुळे येथील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. सद्यास्तिथीत पावसाळा सुरु असल्याने पावासाचे पाणी पुलाखालच्या परिसरात पडलेल्या खड्ड्यांमध्ये प्रचंड प्रमाणात साचून राहते. त्यामुळे सर्वत्र चिखल झालेला असून या चिखलामुळे अनेक लोक त्या ठिकाणी घसरुन पडले आहे. तसेच सदर पुलाचे काम हे रेल्वे ट्रॅक वरुन असल्याने या पुलाचे बांधकाम त्वरीत होणे गरजेचे आहे कारण की, रेल्वे क्रॉसिंग असल्याने रेल्वेचे ये-जा होत असतांना रेल्वे क्रॉसिंग वरील गेट बंद असल्याने अनेक लोकांनी आपातकालीन परिस्थितीत जीव गमाविला आहे. तसेच रेल्वे क्रॉसिंगचे गेट खोलण्याकरीता नागरीकांना अर्धा तासापेक्षा जास्त वेळ वाट पहावी लागते. त्यामुळे अनेकदा एखाद्या ठिकाणी वेळेत न पोहचल्यामुळे आर्थिक व प्रतिष्ठेची हानी होत असते.
तसेच सेलडोह ते सिंदी व सिंदी ते कांढळी या रोडचे बांधकाम सुद्धा अत्यंत संथ गतीने सुरु आहे. सिंदी ते कांढळी पर्यंत रोड हा ५ किमी पेक्षा अधिक बनवायचा असून सदर रस्त्यावर मुरुम, माती व गिट्टी या व्यतिरिक्त काहीच नसतांना घसरत असते. तसेच उन्हाळ्यात याच रस्त्याने कोणतेही वाहन ये-जा करीत असतांना मुरुम व माती मुळे धुळ उडत असते. या धुळीमुळे अनेक नागरीकांना दम्या सारखे आजार झालेले आहे. कळमना, मारडा गावातील नागरीकांना व विद्यार्थ्यांना शाळा व बाजारपेठे करीता सिंदी रेल्वे शहरातच यावे लागते. त्यामुळे या रोडचे काम लवकरात लवकर होण्याची नितांत गरज आहे. या आधी सुद्धा दि. २२ आगस्ट २०२३ रोजी जिल्हाधिकारी यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निवेदन देण्यात आले होते परंतु त्या निवेदनाची कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. वरिल दोन्ही विषयांकीत मुद्यांवर गांर्भियाने लक्ष देवून येत्या १५ दिवसात मुद्दे मार्गी लावावे अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व सिंदी रेल्वे येथील समस्त नागरीक रस्त्यावर उतरुन आंदोलन करणार व यांची संपूर्ण जबाबदारी ही शासन / प्रशासनाची राहील अशी मागणी जिल्हाधिकारी यांना केली आहे.
यावेळी जिल्हाध्यक्ष सुनील राऊत,प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले, माजी नगराध्यक्ष बबनराव हिंगणेकर, समुद्रपूर तालुका अध्यक्ष महेश झोंटिंग, माजी उपाध्यक्ष सुधाकर खेडकर, अशोकबाबू कलोडे, सिंदी शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, प्रा.अशोक कलोडे, वसंत सिरसे, मोहन अंबोरे, रा.यु. शहराध्यक्ष तुषार हिंगणेकर, जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, सुनील शेंडे, दिनेश घोडमारे, अफजल बेरा, गुड्डू कुरेशी, बंटी बेलखोडे, जगदीश बोरकर, हेमराज झाडे, सौ. रुपेशा झाडे, भारत हिवंज, रवी राणाजी, प्रमोद झाडे, विजय मुडे, लक्ष्मण झाडे, शरद झाडे, गणेश मसराम, राहुल तमगिरे, रामा घनवटे, गजानन डंभारे आदी उपस्थित होते.
सिंदी रेल्वे शहरात रेल्वे उडाण पुलाच्या बांधकामाची मागणी अनेक दशकापासून होत आहे. सन २०१४ रोजी सदर पुलाच्या बांधकामाला सुरुवात झाली.परंतु आज पर्यंत सदर काम सुरुच असून या कामाला नऊ वर्षांचा कालावधी झालेला आहे व अजून पर्यंत त्या पुलाचे बांधकाम पूर्ण झालेले नाही. या रखडलेल्या अपूर्ण पुलाच्या कामामुळे येथील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच सेलडोह ते सिंदी व सिंदी ते कांढळी या रोडचे बांधकाम सुद्धा अत्यंत संथ गतीने सुरु आहे. सिंदी ते कांढळी पर्यंत रोड हा ५ किमी पेक्षा अधिक बनवायचा आहे. नागरीकांना व विद्यार्थ्यांना शाळा व बाजारपेठे करीता सिंदी रेल्वे शहरातच यावे लागते. त्यामुळे या रोडचे काम लवकरात लवकर होण्याची नितांत गरज आहे.
अतुल वांदिले
प्रदेश सरचिटणीस
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्रदिनेश घोडमारे, साहसिक न्यूज-24 सिंदी (रेल्वे)