सुनील बुरांडे यांच्या जन्मदिनी विविध कार्यक्रम
साहसिक न्युज24
प्रतिनिधी / वर्धा:
वर्धा येथील जेष्ठ समाजसेवक सुनील बुरांडे यांच्या जन्मदिनी शुक्रवारी 7 आँक्टोंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन मु़डे ले-आऊट परिसरात करण्यात आले आहे. सकाळी 9 वाजता वृक्षारोपण, दुपारी रक्तदान शिबिर, 10 व 12 वीच्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा सायंकाळी 5 वाजता तसेच वीर माता व वीर पत्नी तसेच माजी सैनिकांचा सेवानिवत्तीबद्दल सत्कार व ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार सायंकाळी 6 वाजता होणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्य अधिकारी डॉ. अभ्युदय मेघे, हभप प्रकाश महाराज वाघ, वैद्यकीय जनजागृती मंचचे अध्यक्ष डाँ. सचिन पावडे, जेष्ठ विधितज्ञ गिरीष तकवाले, शेखर भोयर, जगदीश जोतवानी, किशोर बोंडे, सहा. पोलिस निरीक्षक विजय चन्नोरे, श्याम परसोडकर, विपीन मोघे आदींची उपस्थिती राहणार आहे.