सेलू घोराड येथील अनाथ निराधार ११ वृद्ध पुरुषांनी पहिल्यांदा बजावला मतदानाचा अधिकार…

0

सेलू,घोराड / येथील माहेर शांती निवास सेलू घोराड येथे अनाथ निराधार ११ वृद्ध पुरुषांनी पहिल्यांदा बजावला मतदानाचा अधिकार.तसेच माहेर शांती निवास येथे अनाथ ११ वृद्ध असलेल्या नव मतदार नोंदणी केली होती.नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडनुकीत नव्याने मतदान करण्यासाठी अनाथ निराधार मध्ये खुशीचे वातावरण दिसुन आले.स्थानिक सेलू घोराड येथील जि.प. प्राथमिक शाळा या बुथ वरती अनाथ निराधार नव मतदारांनी मतदानाचा पहील्यांदा हक्क बजावला.यामध्ये अनाथ निराधार वृद्ध पुरुष मोठ्या प्रमाणात असल्याचे दिसून आले.यावेळी नवमतदारांनी लोकशाही सोहळ्यामध्ये पहील्यांदा मतदान करीत असल्याने देशाची लोकशाही अधिकाधीक बळकट व्हावी हा उद्देश असल्याचे सांगून पहिल्यांदा लोकसभा निवडणुकीत मतदान केले.

चैताली गोमासे साहसिक न्यूज /24 सेलू,घोराड

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!