🔥हाच तो सेलू तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष व स्वीकृत नगरसेवक रज्जन उर्फ गेंडूरगिटक्या मिश्रा गुन्हा दाखल होताच फरार.🔥हीच ती पाच कोटी किमतीची जमीन २२ लाखात विकली गेंडूरगिटक्या रज्जन मिश्रा याने.🔥गुन्हा दाखल होताच आरोपी फरार (२) मुख्य आरोपी विजय राका वर गुन्हा दाखल का नाही (३) पाच कोटी ची जमीन २२ लाखात हडप करणारा मिश्रा ची पोलिस कोठडी मिळवणार: ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांची माहिती.
🔥सेलू तालुका काँग्रेस अध्यक्ष रज्जन उर्फ गेंडूरगिटक्या सह ३ आरोपी वर गुन्हा दाखल:साहसिक चा दणका.
🔥काँग्रेसच्या तालुकाध्यक्षाने शेतकरी जिनिंग व सहकारी संस्थेची मालमत्ता हडपली, मोठा गैरव्यवहार उघड.! अध्यक्षासह चौघांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल, आरोपी फरार.
(सचिन धानकुटे)सेलू -/ तालुक्यातील एका शेतकरी जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थेच्या मालमत्ता विक्रीत मोठा गैरव्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. शासनाने निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा जादा क्षेत्रफळाची विक्री करून संस्थेचे लाखो रुपयांचे नुकसान करण्यात आल्याने याप्रकरणी संबंधितांवर सेलू पोलिसांत काल शुक्रवारी फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेलू येथील ज्येष्ठ नागरिक सुरेशबाबू जयस्वाल यांनी गेल्या अडीच वर्षांपासून सातत्याने यासंदर्भात विशेष पाठपुरावा केला होता. शेवटी उशिरा का होईना सहकारी संस्थेचे विशेष लेखापरिक्षक सुधीर शंकरराव बनसोड यांना जाग आली आणि त्यांनी याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानुसार शेतकरी जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थेची मालमत्ता हडप करणाऱ्या तत्कालीन अध्यक्ष व सद्यस्थितीत सेलू तालुका काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र रामसूखजी मिश्रा, गणपतराव रामरावजी वांदिले, वसंतराव जागोबाजी तेलरांधे व मुरलीधर भाऊरावजी ठाकरे यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 316(5), 318(4), 3(5) नुसार फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चारही आरोपी गुन्हा दाखल होताच फरार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सेलू येथील शेतकरी जिनिंग व प्रेसिंग सहकारी संस्थेकडे एकूण 597.11 चौ.मी. (खुली जागा 392.65 चौ.मी. व बांधकाम 204.46 चौ.मी.) एवढीच मालमत्ता विक्रीसाठी पात्र होती. मात्र, प्रत्यक्षात तब्बल 1800 पेक्षा अधिक चौ.मी. क्षेत्रफळाची विक्री करण्यात आल्याचे समोर आले आहे.
या व्यवहारात मालमत्तेचे मूल्यांकन वेगवेगळ्या विभागांनी वेगवेगळे ठरवले असतानाही, बाजारभावापेक्षा कमी दरात व्यवहार करण्यात आल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे. संबंधित विक्री व्यवहारात कोट्यवधींचा घोटाळा झाल्याची चर्चा असून, मुद्रांक शुल्कही कमी भरल्याचे निदर्शनास आले आहे.
या प्रकरणात संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र मिश्रा, संचालक गणपतराव वांदिले, वसंतराव तेलरांधे तसेच माजी व्यवस्थापक मुरलीधर ठाकरे यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. विक्री नोंदणीमध्येही अनेक त्रुटी आढळून आल्याने हा संपूर्ण व्यवहार चांगलाच संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
‘जादा मालमत्ता विकून संस्थेला फटका’ अधिकृत परवानगीपेक्षा जास्त क्षेत्र विक्री करून संस्थेचे आर्थिक नुकसान झाले आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांनी नियमबाह्य निर्णय घेतल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.
मालमत्ता खरेदी करणारा मोकाट.! याप्रकरणी संस्था अध्यक्ष, संचालक आणि माजी व्यवस्थापक यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र ती वादग्रस्त मालमत्ता खरेदी करणारा यवतमाळ येथील विजय रांका यांच्यावर मात्र कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नाही, हे विशेष.!
दरम्यान, या प्रकरणामुळे सेलू तालुक्यात चांगलीच खळबळ उडाली असून, यात काँग्रेसचा तालुकाध्यक्षचं मास्टरमाईंड असल्याने प्रशासन आता काय भूमिका घेते याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.