सोनेगावात भीषण आगीच्या ज्वालांनी दहा कुटुंबाची केली राखरांगोळी
साहसिक न्यूज 24
प्रातिनिधी / यवतमाळ :
कळंब तालुक्यातील सोनेगाव येथे दुपारच्या सुमारास भीषण आग लागल्याने यात दहा पेक्षा अधिक घरे जळून खाक झाल्याची घटना घडली.घटनेची माहिती मिळताच तहसीलदार सुनील चव्हाण,ठाणेदार अजीत राठोड गावातील नागरिक आणि सेनेचे अभी पांडे यांनी घटनास्थळी जाऊन मदत केली. काही वेळात अग्निशमन दल दाखल झाले असुन आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.मात्र हवा जोरदार सुरू असल्याने आगीने रूद्र अवतार धारण केल्याने गावात धावपळ सुरू आहे. या घटनेत मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.