🔥हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात अंधार;अधिकारी उजेडात ,रुग्ण मात्र अंधारात.
🔥राष्ट्रवादीचे अतुल वांदिले आक्रमक.. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून स्वतःकडून उपलब्ध करून दिले जनरेटर.
🔥नवजात बालकांची व प्रसुती झालेल्या महिलांची परस्थिती गंभीर.
हिंगणघाट -/हिंगणघाट शहरात आज झालेल्या तुफान पावसाने उपजिल्हा रुग्णालयातील भीषण वास्तव्य चहाट्यावर आले आहे.
वीजपुरवठा खंडित झाल्याने पांढरे शुभ्र असलेल्या रुग्णालयात काळाभोर अंधार पसरला होता… गरोदर महिला, प्रसुती झालेल्या महिला, नवजात बालक अंधारात असून श्वास घेण्यास देखील त्रास होत असल्याची परस्थिती रुग्णालयात आहे. उपजिल्हा रुग्णालयात भरती असलेल्या रुग्णाच्या नातेवाईकाकडून रडत रडत आपली परिस्थिती सांगून अतुल वांदिले यांना रुग्णालयात येण्यासाठी विनंती केली.. रुग्णालयात गेल्यानंतर रुग्णालयाची परिस्थिती अतिशय गंभीर होती ही परिस्थिती बघून स्वतः अतुल वांदिले यांनी उपजिल्हा रुग्णालयात जनरेटर बोलावून घेतले.. *यावेळी रुग्णालयात ठिय्या मांडून राष्ट्रवादीचे नेते अतुल वांदिले यांच्यासह सुनील डोंगरे, पत्रकार मोहम्मद रफिक, बालू वानखेडे, अमोल बोरकर दशरथ ठाकरे श्रीकांत भगत, व अनेक नागरिकांनी आंदोलन केले..* रुग्णालयात डॉक्टर पोलीस घेऊन आले अशी पहिली घटना हिंगणघाट शहरातील नागरिकांना हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयात पहावयास मिळाली. रुग्णालयातील स्वच्छतागृहामध्ये माकोडे होते. सर्वत्र घाण पसरली होती व काळाभोर अंधार होता रुग्णांची बेहाल होते नातेवाईक परेशान होते… रुग्णालयात वीज नसतानाही जनरेटरची सुविधा उपलब्ध नाही, तसेच पाण्याची सोयही ठप्प असल्याने रुग्णालयातील मूलभूत सुविधा पूर्णपणे कोलमडल्या.
रुग्णालयाच्या वार्डमध्ये रुग्ण अंधारात बसलेले असताना अधिकारी मात्र उजेडात काम करताना दिसून आले. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, रुग्णालय परिसरात अस्वच्छता व झाडांवरील माकोड्यांचा त्रास अधिक प्रमाणात असल्याने रुग्णांच्या आरोग्याला अतिरिक्त धोका निर्माण झाला आहे.
या परिस्थितीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी उपजिल्हा रुग्णालयाला धाड टाकून पाहणी केली. त्यांनी रुग्णालय प्रशासनाच्या भोंगळ कारभारावर कडाडून टीका केली. *”रुग्णालय म्हणजे रुग्णांना जीवनदान देण्याचे ठिकाण असते. मात्र हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालय स्वतःच रुग्ण झाल्यासारखे आहे. अंधारात रुग्ण बसलेले असतानाअधिकारी मात्र उजेडात आहेत, ही दुर्दैवी बाब आहे,”असे वांदिले म्हणाले.
स्थानिक नागरिकांनीदेखील या प्रकारामुळे प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “आम्ही रुग्णालयात उपचारासाठी आलो, पण इथेच स्वतः आमचा जीव धोक्यात आहे. जनरेटर, पाणी आणि मूलभूत सुविधा नसेल तर हे रुग्णालय कसले?” असा सवाल नागरिकांनी केला.
सध्या हिंगणघाटमध्ये या घटनेची मोठी चर्चा सुरू असून, उपजिल्हा रुग्णालयाला तात्काळ आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे.