हिंगणघाट येथील लक्ष्मी चित्रपटगृहात शॉर्टसर्किटमुळे आग ; प्रेक्षक व टाकीज कर्मचाऱ्यांची धावपळ
हिंगणघाट येथील लक्ष्मी चित्रपटगृहात शॉर्टसर्किटमुळे आग ; प्रेक्षक व टाकीज कर्मचाऱ्यांची धावपळ
प्रतिनिधी / वर्धा:
हिंगणघाट शहरातील लक्ष्मी चित्रपटगृहात चित्रपट सुरू असताना शॉर्टसर्किटच्या कारणाने लागलेल्या आगीत प्रेक्षक तसेच टाकीज कर्मचाऱ्यांची मोठी धावपळ झाली.
काल रात्री नऊ वाजता आर आर आर चित्रपटाचे शो च्या दरम्यान ही आग लागली असून या दरम्यान कोणतीही जिवितहानी झाली नाही.
मंगळवारी रात्री १०.३० च्या दरम्यान बाल्कनीतील इलेक्ट्रिक केबल शॉर्टसर्किटने जळाले, ही किरकोळ आग नियंत्रणासाठी अग्निशमन सिलिंडरचा उपयोग करण्यात आला,यावेळी या सिलिंडर मोठा आवाज झाला,याचवेळी आग लागण्याची वार्ता प्रेक्षकांना कळताच एकच धावपळ झाली.
सर्वच प्रेक्षक जिवाच्या भीतीने चित्रपटगृहाबाहेर पडण्यासाठी एकच गर्दी करू लागले,बाहेर आल्यानंतर काही लोकांनी तिकिटाचे पैसे परत मिळण्यासाठी आग्रह धरला यावरून चित्रपटगृह कर्मचारी व प्रेक्षकांमधे निर्माण झालेल्या तणावामुळे पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस आल्यानंतर पोलिसांनी प्रेक्षकांना शांत केल्याने वातावरण निवळले,परंतु चित्रपटगृह बंद करण्यात आल्याने सिने प्रेक्षाकांना घरी परतावे लागले.