हिंगणघाट येथे ओबीसी आरक्षण बचावार्थ ओबीसी (व्हिजे,एनटी, एसबीसी)चा महामोर्चा..

0

हिंगणघाट / शहरात ओबीसी संघर्ष समितीच्यावतीने महामोर्चाचे आयोजन करण्यात आले.सदर मोर्चाचे आयोजन स्थानिक हरिओम सभागृह येथून करण्यात आले,शहरातील प्रमुख मार्गाने मार्गक्रमण करीत हा मोर्चा स्थानिक उपविभागीय कार्यालयावर नेण्यात आला.ओबीसींच्या खालील प्रमुख मागण्यासंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले २७ डिसेंबर २०२३ व २६ जानेवारी २०२४ ची महाराष्ट्र शासनाची अधिसूचना रद करण्यात यावी,ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी तसेच ओबीसींसाठी लागु असलेली क्रिमीलेअरची अट रद्द करण्यात यावी.इत्यादी एकुण १४ विविध मागण्यासंदर्भात शासनाकडे निवेदन देण्यात आले.या महामोर्चाला माजी आ.प्रा.राजु तिमांडे,माजी नगराध्यक्ष पंढरी कापसे,ओबीसी संघर्ष समितीचे अध्यक्ष शशिकांत वैद्य,सचिव जगदीश वांदिले,सतिश धोबे,प्रविण उपासे, विठ्ठल गुळघाणे,अनिल जवादे, प्रा.दिवाकर गमे,अनिल जवादे,सौरभ तिमांडे,गजु कुबडे,मनोज वरघणे, प्रा.शेषराव येरलेकर,अशोक रामटेके, अमोल बोरकर,राजु खुपसरे,सुनिल पिंपळकर,गोपाल मांडवकर,बाळा मानकर,बाबाराव थुटे,महेश झोटींग, सुरेंद्र बोरकर,गुणवंत कोठेकर, डॉ.रामकृष्ण खुजे,अनंता गलांडे, सतिश ढोमणे,दशरथ ठाकरे,मनिष देवढे,अमित चाफले,धनंजय बकाने, अनिल भोंगाडे,गौरव तिमांडे,राजु मुडे, मारोती महाकाळकर,प्रविण कडू, सुनिल भुते,दत्ता चौधरी,जयंत मानकर,बाळा पुसदेकर,मोहन गलांडे, अशोक मोरे,प्रशांत घवघवे,प्रकाश राऊत,नितीन भुते,गुणवंता कारवटकर, विष्णु इटनकर,संभाजी घाटुर्ले,दिनेश वाघ,मनोहर झोटींग,महेश माकडे अविनाश धोटे,वासुदेव पडवे,अशोक पराते,राजु मस्कर,राकेश झाडे,मनोज वैरागडे,सुनील आष्टीकर,पप्पु आष्टीकर,अब्दुल कदिर बक्ष,शकील अहमद,सुनिल हरबुडे,राहुल गिरडे, राजु घुबडे,गणपत गाडेकर,भोला निखाडे,दिपक भालकर,दिलीप चौधरी, नरेंद्र गलांडे,आशिष भोयर, दिवाकर डफ,चोखाराम डफ,विकी गिरडे,नितीन वैद्य,मधुकर कुटे,आशिष हरबुडे,दिगंबर नवघरे,बंडू कटवाले,विशाल आसुटकर,विक्रम देवगिरकर,अभिलाष गिरडकर,रवी काटवले,गणेश वैरागडे,अक्षय बेलेकर, भाष्कर ठवरी,गजानन गलांडे,एड.नंदकुमार वानखेडे,नयन निखाडे,हर्षल बुरीले,हर्षल तपासे,पवन काकडे,जया भोपळे,मिथुन ठाकरे,बाबा पांगूळ,कुंडलिक बकाने,हरीश काळे,रोहित हरणे, जयंत मानकर,अक्षय सालवटकर,देवानंद फाटे,पंकज भट,देविदास तिमांडे,रजंनी कापसे,निता धोबे, रागीनी शेंडे, विद्या गरी,मंदाकीनी ढाले, सारीका अनासाणे, सुनिता तळवेकर, सिमा गलांडे, अर्चना नांदुरकर तसेच मोठया संख्येने ओबीसी प्रवर्गातील बंधुभगिनी, युवक, युवती, विद्याथी, विद्यार्थीनी,अनेक सामाजीक संघटना व राजकीय पक्षांचे नेते,कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच ओबीसी संघर्ष समितीचे सर्व पदधिकारी उपस्थित होते.मोर्चा यशस्वी करण्यासाठी ज्या सर्व समाज घटकांनी परिश्रम घेतले त्यांचे ओबीसी संघर्ष समितीचे वतीने आभार व्यक्त करीत मोर्चाचा समारोप करण्यात आला.

आ.समिर कुणावार यांचेशी ओबीसी समितीची चर्चा

आज ओबीसी संघर्ष समितीचेवतीने आमदार समिर कुणावार यांचेशी बैठक करीत चर्चा करण्यात आली.
आ. कुणावार यांनी शासनाकडे सकारात्मक बाजू मांडण्याचे आश्वासन शिष्ट मंडळाला दिले.

ईकबाल पहेलवान साहसिक न्यूज /24 हिंगणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!