हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट शहरातील असंख्य कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश.

0

आ.समिर कुणावार यांचे प्रमुख उपस्थितीत प्रवेश सोहळ्याचे आयोजन.

हिंगणघाट : विधानसभा क्षेत्रात दिवसेंदिवस भाजपाचा मोठया प्रमाणात विस्तार होत असून विधानसभा क्षेत्रातील नागरीक तसेच युवा कार्यकर्ते आ.समिर कुणावार यांचे नेतृत्वावर विश्वास व्यक्त करीत मोठया प्रमाणात भारतीय जनता पक्षात प्रवेश करीत आहेत.
आज दि.२१ रोजी हिंगणघाट, समुद्रपुर, सिंदी विधानसभा क्षेत्रातील हिंगणघाट येथील बहुसंख्य कार्यकर्त्यांनी आ. समीर कुणावार यांचा विधानसभा क्षेत्रातील लोकाभिमुख विकास तसेच कार्यसम्राट आमदार यांची कार्यशैली पहाता मोठ्या संख्येने भाजपात प्रवेश केला.सदर प्रवेश सोहळा आज दि.२१ रोजी आ. समीर कुणावार यांच्या स्थानिक जनसंपर्क कार्यालयात प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले,याप्रसंगी प्रामुख्याने हिंगणघाट येथील शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख प्रफुल क्षीरसागर, धनश्री क्षीरसागर, उमेश कोहूरकर, प्रशांत विरुळकर, कृष्णाजी मांडवकर, अमित मुळे, यशवंत मांडवकर, किशोर हविलकर, विनोद नक्षीने, योगेश अनकर, रविकिरण तेलरांधे, सेवक खैरकार , संजय जुमडे, राजेंद्र हिवरे इत्यादी रीतसर कार्यकर्त्यांना भाजपात प्रवेश देण्यात आला.
उपरोक्त कार्यक्रम आमदार समीर भाऊ कुणावार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
उपरोक्त
कार्यक्रमाचेवेळी कार्यसम्राट आ.समीर कुणावार यांचेसह भाजपाचे हिंगणघाट शहराध्यक्ष भूषण पिसे, माजी नगरसेवक वसंत पाल गुरुजी, माजी नगरसेविका छाया सातपुते, प्रा. योगेश वानखेडे
सहसंयोजक,आय टी सेल,भाजपा,वर्धा जिल्हा.., महिला विधानसभा प्रमुख नलिनी सयाम, भाजपा कार्यकर्ता राजू गंधारे , मुन्ना त्रिवेदी इत्यादी पदाधिकारी तसेच जेष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते.

ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज-24 हिंघणघाट

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!