हिंगनघाट येथे मोठ्या हर्षोल्लासात ईद मिलादुन्नबी साजरी.
जुलूस च्या मार्गांवर ठीक ठिकाणी मुलांसाठी आइसक्रीम,चॉकलेट, फळं, पाणी वाटप करण्यात आले. आणि त्या खाद्य पदार्थ मुळे रत्याववर होणारा कचरा स्वतः उचलनू सामाजिक संदेश दिला.
शांति दूतपैग़म्बर हज़रत मोहम्मद साहब यांच्या जन्मोत्सव वर सगळ्या जगात मुस्लिम समाज जशने ईद मिलादुन्नबी मोठ्या धूम धडाक्यात साजरी करतात.पैग़म्बर मोहम्मद साहेब इस्लामि तारीख १२ रबीउल अव्वल या दिवशी जगात आले. हीच तारीख ईद मिलाद सन उत्सव म्हणून साजरी केली जाते.यानिमित्त दरवर्षी प्रमाणे याही वर्षी जुलुसे मोहम्मदी चे आयोजन करण्यात आले.डॉक्टर रुबा चौक येथून काढण्यात आलेला जुलुस शहराच्या प्रमुख मार्गाने नेण्यात आला.जुलूस मधे जामा मस्जिद,निशानपूरा मस्जिद, टाका मस्जिद,पिली मस्जिद, सुभानिया मस्जिद,ग़रीब नवाज़ मस्जिद चे पेश ईमाम सहाब ची उपस्थिती होती.आणि हजारोच्या संख्येने मुस्लिम बांधव घोषणा करता सामील झाले होते.पैग़म्बर मोहम्मद साहब याना अल्लाह ने आपला दूत म्हणजेच संदेश वाहक बनवून जगात पाठवले आणि समाजातील वाईट गोष्टींना ख़त्म करन्या साठी त्यांनी दिवस रात्र कार्य केले.ज्या वेळेस मुली जन्माला आली तेव्हा त्याला जिवंत दफन करायची प्रथा होती, मुलगी झाल्यावर उदासी व्यक्त केली जात होती त्यावेळी पैगंबर मोहम्मद साहेबांनी म्हंटल होतं माझा कुटुंब माझ्या मुली चालवणार आणि आज पर्यंत त्यांच्या मुली फातेमा मुळे त्त्यांच नाव पुढे चालला आहे
त्यावेळी बेटी बचाओ सारख्या कार्यक्रम त्यांनी आयोजित केले.
_आपला कचरा स्वतः उचलून धार्मिक रैलीत दिला सामाजिक संदेश_
जुलूस च्या मार्गांवर ठीक ठिकाणी मुलांसाठी आइसक्रीम, चॉकलेट, फळं, पाणी वाटप करण्यात आले. आणि त्या खाद्य पदार्थ मुळे रत्याववर होणारा कचरा स्वतः उचलनू सामाजिक संदेश दिलायावेळी जुलुस मध्ये मरहबा ग्रुप द्वारा ८,९ वर्षा पासून स्वछता अभियान केल्या जात आहे.जुलुस मध्ये जे काही खाण्यासाठी दिले जाते, आणि त्यांचे खाणे झाल्यानंतर जो हा कचरा होतो तो कचरा महरबा ग्रुप ने स्वच्छ करन्याचे कार्य केले. जुलुस च्या अंतिम भाग मधे काही युवा नवे कपडे परिधान करून सड़के वरचा कचरा उचलून कचरा गाडी टाकताना चे दृश्य सर्वा साठीअनुकरणीय असेच होते.त्याच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.त्यांच्या या कार्यामुळे जुलुस संपल्यावर हि सड़के वर कचरा उरला नाही. प्रत्येक उत्सव,रैली नंतर शहर स्वछ असले पाहिजे असा संदेश यातून देण्यात आला.जुलुस समारोपिय कार्यक्रम जामा मस्जिद चौक येथे करण्यात आला.या वेळी उपविभागीय पोलिस अधिकारी रौशन पंडित, पुलिस निरीक्षक मारुती मुलुक, ईमाम साहब जावेद खान, हाजी मोहम्मद रफीक पत्रकार, पूर्व नगर सेवक प्यारु भाई कुरैशी इत्यादि ची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फरहान काज़ी ने केले कार्यक्रम च्या अंतिम टप्यात सलाम पठण करून देशात अमन, शांति साठी दुआ मागण्यात आली.
ईकबाल पहेलवान सहासिक न्यूज-24