३४ हिंदू मुलींची विक्री करून धर्मांतर केल्याचा खळबळजनक दावा;  भाजप जिल्हाध्यक्षांच्या विधानाने राज्यात खळबळ 

0

🔥३४ हिंदू मुलींची विक्री करून धर्मांतर केल्याचा खळबळजनक दावा; 

🔥भाजप जिल्हाध्यक्षांच्या विधानाने राज्यात खळबळ.

​यवतमाळ -/ महाराष्ट्र राज्याच्या सामाजिक आणि राजकीय वर्तुळात एक मोठी खळबळ उडाली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल ३४ हिंदू मुलींची राज्य आणि राज्याबाहेर विक्री करून त्यांचे धर्मांतर करण्यात आल्याचा गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी केला आहे. या प्रकरणाला त्यांनी ‘लव्ह जिहाद’चे स्वरूप असल्याचे म्हटले असून, एका मोठ्या सिंडिकेटद्वारे हा काळा बाजार चालवला जात असल्याचे त्यांनी पुराव्यानिशी मांडले आहे.

​भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार, यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव, केळापूर, मोहादा, वडकी आणि कळंब या तालुक्यांमधून गेल्या काही महिन्यांत एकामागून एक हिंदू मुली बेपत्ता होत होत्या. सुरुवातीला या घटनांकडे मुलींनी स्वतःच्या इच्छेने घर सोडले असावे, या दृष्टिकोनातून पाहिले जात होते. मात्र, एका विशिष्ट कालावधीत एवढ्या मोठ्या संख्येने मुली गायब होण्यामागे काहीतरी मोठे षडयंत्र असावे, असा संशय आल्याने भाजपकडून गेल्या ४ ते ६ महिन्यांपासून या प्रकरणाचा समांतर तपास आणि पाठपुरावा सुरू होता.

ॲड ​चव्हाण यांनी दावा केला आहे की, हे केवळ प्रेमप्रकरण किंवा घर सोडून जाण्याचे प्रकरण नसून, यामागे एक मोठे ‘सिंडिकेट’ कार्यरत आहे. या सिंडिकेटमध्ये काही ठराविक लोकांचा समावेश असून, ते अल्पवयीन आणि गरजू मुलींना आपल्या जाळ्यात ओढतात.

भाजप जिल्हाध्यक्ष यांच्या म्हणण्यानुसार या मुलींना यवतमाळमधून पळवून नेल्यानंतर त्यांची विक्री ८० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत केली जाते. या मुलींना प्रामुख्याने मुंबई, पुणे आणि बेंगळुरू सारख्या मोठ्या शहरांमध्ये पाठवले जाते. विक्री केल्यानंतर या मुलींचे सक्तीने धर्मांतर केले जाते आणि त्यांना मुस्लिम बनवले जाते. याला प्रफुल्ल चव्हाण यांनी ‘लव्ह जिहाद’चा एक संघटित प्रकार असल्याचे म्हटले आहे. ​या खळबळजनक विधानानंतर यवतमाळ जिल्ह्यात आणि संपूर्ण राज्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकाच जिल्ह्यातील ३४ मुलींची अशा प्रकारे विक्री होणे, हे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. ग्रामीण भागातील मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या सिंडिकेटमध्ये स्थानिक लोकांचा हात आहे का? या मुली सध्या कुठे आहेत? आणि त्यांना परत आणण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

​​यवतमाळमधील हे प्रकरण केवळ एका जिल्ह्यापुरते मर्यादित नसून, याचे धागेदोरे आंतरराज्य स्तरावर पसरलेले असण्याची शक्यता आहे. भाजप जिल्हाध्यक्षांनी केलेल्या या गंभीर आरोपानंतर आता राज्य सरकार आणि पोलीस प्रशासन काय पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील सिंडिकेटचा पर्दाफाश करून पीडित मुलींना न्याय मिळवून देणे, हे आता प्रशासनासमोरचे मोठे आव्हान आहे.

 🔥जिल्हा पोलीस अधिक्षकांची घेतली भेट.

यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यातील काही बालीका बेपत्ता असल्याचे प्रथमसकृतदर्शनी दिसुन आले त्यानंतर त्याची माहीती घेतली असता या अल्पवयीन बालीकांचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता त्यामुळे जिल्ह्यातील एकंदरीत परस्थीती पाहता जिल्हा पोलीस अधिक्षक कुमार चिंता यांची भेट घेवुन संबधीत विषयावर सखोल चर्चा करण्यात आली. विशेष म्हणजे या 34 मुलीनी नेमक्या सध्या कोणत्या परस्थितीत आहे. आणि पोलीस यावर तातडीने काय कारवाई करतील याकडे लक्ष लागले आहे.

🔥 भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांची प्रतिक्रिया.

​प्रफुल्ल चव्हाण यांनी प्रशासनावर विश्वास व्यक्त करतानाच, उपलब्ध झालेल्या ऑडिओ क्लिपची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या क्लिपमधील संभाषणातून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. ​आदिवासी भागातील मुलींना फुस लावून पळवून नेणे किंवा त्यांचे धर्मांतर करणे हा केवळ गुन्हेगारीचा प्रकार नसून, तो मानवी तस्करीशी जोडलेला एक सामाजिक धोका आहे. अशा घटनांमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागांत भीतीचे वातावरण निर्माण होऊ शकते.(क्रमशः)

           ब्युरो रिपोर्ट साहसिक       News-/24 यवतमाळ 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!