🔥भद्रावती नगरपालिका सभागृहात पार पडली मा आमदार करणं देवतळे यांची आढावा सभा.
भद्रावती -/ आज दिनांक 20/04/2026 रोजी आमदार करणं देवतळे यांनी नगर पालिका क्षेत्रातील शासकीय निधीतील विकास कामाचा आढावा घेतला केंद्र व राज्य शासनाचे विविध योजनेतून विकास कामे घेण्यात आली आहे दलीतवस्ती सुधार योजना ,घरकुल योजना ,अमृत वाढीव पाणीपुरवठा ,नगरोथान ,पर्यटन विकास , डीपीडिसी निधी व खनिज विकास निधी आमदार कारण देवतळे निवडून आल्यावर महाराष्ट्र शासनाकडून नगरपालिकेला मिळवून दिला त्या सर्व कामाच्या प्रगती बाबत आढावा घेतला आमदार यांनी उपस्थित नागरिकांच्या समस्या एकूण घेतल्या व शासनाच्या निधीतील विकास कामाबाबत अनेक नागरिकांनी आक्षेप घेतला असता प्रशासनाला चांगलेच झापले व हयगय व कामे निकृष्ट दर्जाची होणार नाही याची काळजी घेण्याची प्रशासनाला निर्देश दिले यावेळी नगराध्यक्ष प्रफुल चटकी मुख्याधिकारी व सर्व विभागाचे अधिकारी, पोलीस अधिकारी नगरसेवक, व अनेक नागरिक उपस्थित होते सुरवातीला नगराध्यक्ष यांनी आमदार साहेबांचे फुलगुच्छा देऊन स्वागत केले. माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार यांनी केंद्र शासन ,50% राज्य शासन 40% शासनाकडून मिळत असेलेल्या मोठ्या योजनेत नगरपालिकेच्या 10%हिस्सा बाबत प्रश्न उपस्थित केला .नगरपालिका डबघाईस आल्या असून नगरपालिकांचे उत्पन्न फार कमी असल्याने 10%निधीसाठी कर्ज घेतल्यास कर्जाचे डोंगर वाढून भविष्यात नगर पालिका साधे कर्मचार्यांचे पगार ,आरोग्य, पाणी पुरवठा ,दिवाबत्ती या सारख्या मूलभूत सुविधा स्वबळावर देने कठीण होणार आहे तरी शासनाने 10% हिस्सा ची अट रद्द करून 100% अनुदानाच्या योजना मंजुर काराव्या यासाठी आमदार साहेबांनी शासन स्तरावर प्रयत्न करावे अशी मागणी केली.