🔥७५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वितरण,जबाबदार नागरिक बणण्यासाठी शिस्तीची गरज,मान्यवरांचे मार्गदर्शन
सेवाग्राम -/ येथील यशवंत विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शैक्षणिक साहित्य व गणवेश वितरणाचा कार्यक्रम यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सतीश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक १० जुलै रोजी संपन्न झाला.आयोजित कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट सेवाग्राम चे सचिव डॉ शिवकुमार,महिला सेवा मंडळाच्या अध्यक्षा गीता गुप्ता, सुधिर गांधी,शाळेच्या प्राचार्या वंदना राऊत,शिक्षक प्रतिनिधी अनिता भिसे इ.मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते शिक्षण महर्षी बापूरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले.
या प्रसंगी गीता गुप्ता यांनी ट्रस्ट ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करून त्यांच्या शिक्षणात अडचण निर्माण होऊ नये.शासन विद्यार्थ्यांसाठी अनेक योजना राबवित असले तरी सामाजिक जबाबदारी म्हणून ट्रस्ट च्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश वितरणाचे काम एक जबाबदारी म्हणून करीत आहेत.
सतीश राऊत यांनी अध्यक्षीय भाषणात विद्यार्थी एक जबाबदार घटक असल्याने भविष्याचा विचार करता शालेय जीवनातच शिस्त आवश्यक आहे.गणवेश समानतेची भावना निर्माण करते.सर्वांना संधी असली तरी काही घटकांना मदतीची गरज असल्याने विद्यार्थी हित लक्षात घेऊन कार्य करणारी संस्था,व्यक्ती मदतीचा हात देत असल्याने त्यांच्या मदतीची जाणीव ठेवून आपलं भविष्य घडविण्याचे आवाहन सतीश राऊत यांनी केले.
या प्रसंगी ६ ते ९ या वर्गातील ७५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व गणवेश मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.यासाठी स्वामी विवेकानंद चॅरिटेबल ट्रस्ट सेवाग्राम, रेणूका मेडिकल स्टोअर्स सेवाग्राम चे संचालक राम गोडसे आणि सुधीर एजन्सी चे संचालक सुधीर गांधी यांनी सहकार्य केले.संचालन शुभांगी चिकटे, प्रास्ताविक वंदना राऊत तर उपस्थितांचे आभार वंदना देशमुख यांनी मानले.शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.शालेय परिसरात पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते बकुळ,बिहाडा आणि जांभूळ या प्रजातीचे झाडे लावण्यात आली.